दुर्मिळ सापाची तस्करी करणारे अटकेत


दुर्मिळ सापाची तस्करी करणारे अटकेत
SHARES

दुर्मिळ मांडुळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या दोघांना कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. काळ्या जादूसाठी या मांडुळ सापाचा वापर केला जात असल्यामुळे बाजारात या सापाला मोठी मागणी असते. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सापाची किंमत ही दीड कोटी रुपये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 


तीन फुटाचे मांडूळ

कांदिवली पोलिस ठाणे परिसरात दोन संशयित व्यक्ती मांडुळ जातीच्या सापाची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कांदिवलीच्या महावीर नगर परिसरात सापळा रचला होता. त्यावेळी त्या परिसरात सुनील मारुती माने(२५) आणि संतोष रामचंद्र अहिरे(३०) हे संशयितरित्या फिरत होते. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत, त्यांची झडती घेतली असता. त्यांच्याजवळ तीन फुट लांब मांडुळ जातीचा साप आढळून आला.


जादू टोण्यासाठी वापर

हे दोघेही गोरेगावचे रहिवाशी आहेत. या दोघां विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. अतिशय दुर्मिळ जातीचा हा सर्प असून अंधश्रद्धेपायी जादू टोण्यासाठी त्याचा वापर करण्यात येतो.. तसेच परदेशात औषधींसाठी त्याचा वापर होत असल्यामुळे त्याची तस्करीही मोठ्याप्रमाणात केली जाते. आरोपींनी यापूर्वीही अशा पद्धतीने सापांची विक्री केली आहे का, याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. 



हेही वाचा - 

मुंबईत जबरी चोरीचं प्रमाण ५० टक्क्यांनी वाढलं




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा