सहकारी महिलेचा विनयभंग करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकास अटक

काही काम नसताना, संबधित महिला शिपायास वारंवार बोलवून तिच्याशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न करायचे, तसेच या ना त्या कारणाने तिला चुकीचा स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महिला तरुणीने पोलिस उपनिरीक्षकावर केला आहे.

सहकारी महिलेचा विनयभंग करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकास अटक
SHARES

खाकीला काळीमा फासणारी घटना मुंबईच्या आझाद मैदान पोलिसा ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आपल्याच सहकारी महिला पोलिस शिपायाचा विनयभंग केल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी एका पोलिस उपनिरीक्षकाला अटक केली आहे. विनोद बल्लाळ (३८) असं या आरोपी पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी आझाद मैदान पोलिस अधिक तपास करत असल्याचे पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितलं.   

महिला पोलिस शिपाईचा विनयभंग

मुंबईत संशयित वस्तू किंवा स्फोटकांचा शोध घेण्यासाठी श्वानांची मदत घेतली जाते. या श्वान पथकात २४ वर्षीय तक्रारदार महिला पोलिस कर्मचारी ही फेब्रुवारी २०१९ पासून कार्यरत आहेत. पोलिस आयुक्तालयाच्या शेजारी हे श्वानपथक कार्यालय आहे. या कार्यालयात बल्लाळ हे प्रभारी अधिकारी आहेत. दरम्यान पीडित महिला कर्मचारी त्या कार्यालयात दाखल झाल्यापासून बल्लाळची तरुणीवर वाईट नजर होती. अनेकदा काही काम नसताना, संबधित महिला शिपाईस वारंवार बोलवून तिच्याशी जवळीकता साधण्याचा बल्लाळ प्रयत्न करायचे, तसेच या-ना-त्या कारणाने तिला चुकीचा स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महिला तरुणीने केला आहे.

पोलिस उपनिरीक्षकाला अटक

तरुणीने वरिष्ठांकडे काही दिवसांपूर्वी याबाबत लेखी तक्रार नोंदवली होती.  त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिस उपनिरीक्षक विनोद बल्लाळ यांच्या विरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी बल्लाळ याला अटक केली आहे.

हेही वाचा

अनैतिक संबंधाच्या संशयावरून कांदिवलीत पत्नीची हत्या


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा