अनैतिक संबंधाच्या संशयावरून कांदिवलीत पत्नीची हत्या

दोन वर्षापूर्वी मोहम्मद याचा नागपूर येथे भंगारचा व्यवसाय होता. मात्र तेथे पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तो दोन वर्षांपूर्वी मुंबईत स्थायिक झाला.

अनैतिक संबंधाच्या संशयावरून कांदिवलीत पत्नीची हत्या
SHARES

अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून कांदिवलीत एका भंगार विक्रेत्याने पत्नीची हत्या केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. हत्येनंतर आरोपीने स्वत:हून पोलिसांना माहिती देत आत्मसमर्पण केले. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून मोहम्मद रकीब अब्दुल हफीज खान (४४) याला अटक केली आहे.


नागपूरहून मुंबईत स्थायिक

कांदिवलीच्या गांधीनगरमध्ये खान गल्ली परिसरात मोहम्मद पत्नी अजमतानुसी (४०), भाऊ-वहिनी व मुलांसोबत राहत होता. मोहम्मद याचा भंगारचा व्यवसाय आहे.  दुकानाच्या पोट माळ्यावर हे भाऊ आलटून पालटून झोपायचे. दोन वर्षापूर्वी मोहम्मद याचा नागपूर येथे भंगारचा व्यवसाय होता. मात्र तेथे पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तो दोन वर्षांपूर्वी मुंबईत स्थायिक झाला. 


गळा आवळला

मुंबईत आल्यानंतरही मोहम्मद पत्नीवर संशय घ्यायचा. या कारणांवरून सोमवारी भाऊ-वहिनी मुलांसोबत पोट माळ्यावर झोपले असताना दोघांमध्ये खाली दुकानात वाद झाला. यावेळीमोहम्मदने अजमतानुसीला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी अजमतानुसी आरडाओरडा करू लागल्याने मोहम्मदने तिचे तोंड धरून गळा आवळत तिची हत्या केली.  हत्येनंतर मोहम्मदने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून या हत्येची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मोहम्मदला अटक केली. या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांनी दिली.



हेही वाचा -

मुंबईच्या समुद्रात महाराजा जहाजाला आग, चिफ इंजिनीअरचा मृत्यू

लाचखोर मुकादम एसीबीच्या जाळ्यात




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा