लाचखोर मुकादम एसीबीच्या जाळ्यात


लाचखोर मुकादम एसीबीच्या जाळ्यात
SHARES

बृहन्मुंबई महापालिकेच्या गोवंडी येथील एम पूर्व प्रभागातील मुकादमला १० हजार रुपयांची लाच घेताना एसीबी (लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या) पोलिसांनी अटक केली आहे. घर दुरूस्ती करण्यासाठी काढलेल्या तक्रारदाराकडे विनोद जाधव (३९)ने ही पैशांची मागणी केली होती. त्यानुसार लाच स्विकारताना रंगेहाथ पोलिसांनी पकडले.


काम थांबवत होते

गोवंडी परिसरात तक्रारदार हे चाळीत रहात असून पावसाळ्यापूर्वी त्यांनी घरात दुरूस्तीचे काम काढले होते. या कामात पालिकेतर्फे मुकादम विनोद हे वारंवार जाऊन काम थांबवत होते. तसेच कामात अडथळा करू नये यासाठी तक्रारदाराकडे १५ हजार रुपये लाच मागत होते. मात्र लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने याबाबत एसीबी कार्यालयात तक्रार नोंदवली. त्यानंतर ११ एप्रिलला फिर्यादी यांनी मुकादमी जाधवला फोन केला असता प्रत्यक्ष भेटून पैशाचे काय ते ठरवू असे सांगितले. त्यानुसार तडजोडीअंती दोघांमध्ये १० हजार रुपये लाच देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदार यांनी विनोदला सोमवारी लाच म्हणून १० हजार रुपये देताना रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी एसीबीचे अधिकारी अधिक तपास करत आहेत. 



हेही वाचा -

मुंबईत जबरी चोरीचं प्रमाण ५० टक्क्यांनी वाढलं




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा