शिफू सनकृतीच्या सुनील कुलकर्णीचे परदेशी कनेक्शन !

  Mumbai
  शिफू सनकृतीच्या सुनील कुलकर्णीचे परदेशी कनेक्शन !
  मुंबई  -  

  शिफू सनकृती प्रकरणी अटक केलेल्या सुनील कुलकर्णी प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून याप्रकरणी आणखी पाच पालक समोर आले आहेत. पालिसांनी या पाचही जणांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. सुनील कुलकर्णी याचे परदेशी कनेक्शन समोर आल्याची महितीही पोलिसांनी दिली. जाळ्यात अडकलेल्या तरुण-तरुणींना परदेशात या शिफू सनकृतीचा कशाप्रकारे उगम झाला आहे, याची खोटी बतावणी करत, तो या तरुणींना आणखी खोल जाळ्यात अडकवत असल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे, सुनील कुलकर्णीला परदेशातून आर्थिक मदत मिळत असल्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तवली आहे.

  स्वतःला मानसोपचार तज्ज्ञ म्हणवून घेणाऱ्या कुलकर्णीने शिफू सनकृतीच्या नावाखाली अनेक तरुण-तरुणींना वेश्या व्यवसाय आणि ड्रग रॅकेटच्या जाळ्यात अडकवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  तसेच, या शिफू सनकृतीच्या नावाखाली सुनील कुलकर्णीने अनेक परदेशवाऱ्या केल्या असून, त्याला परदेशातून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळत असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार, शिफू सनकृतीचे बँक खाते तसेच सुनील कुलकर्णीचे बँक खाते तपासण्यास गुन्हे अन्वेषण विभागाने सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे कुलकर्णीच्या अपरोक्ष शिफू सनकृतीची धुरा नेमकी कोण वाहत आहे? यामागे आणखी कोणी आहे का? याचा देखील पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 3 मे पर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.