ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या परदेशी महिलेला अटक


ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या परदेशी महिलेला अटक
SHARES

ऑनलाइन फ्रॉड द्वारे लोकांना लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या एका टोळीचा विनोबा भावे मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दिल्ली मध्ये बसून ही टोळी देशाच्या विविध भागांन मध्ये फसवणुक करत होती.  मात्र मुंबईत राहणाऱ्या एका महिलेला या टोळीने  फसवले आणि आणि मुंबई पोलिसांच्या रडारवर ही टोळी आली. "ANDREA OLIVIERA" या नावाने इंस्टाग्राम वर खोटे अकाउंट बनवून मुंबईत राहणार्‍या महिलेशी मैत्री केली आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्या कडून १७ लाख २२ हजार १५०रुपये या महिलेने लुबाडल्याचे तपासात समोर आले आहे.

वीबी नगर पोलीसांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ गुन्हा दाखल करत युद्धपातळीवर तपास सुरू केला आणि दिल्लीतून फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली ज्याच्या नंतर विबी नगर पोलीस स्टेशनच एक पथक दिल्लीला रवाना झालं....पोलीसांनी दिल्लीतील गुरुनानक नगर "jacinta owokonu ofana" वय २६ या नायजेरियन महिलेला अटक केली..तिच्या कडून "nigeria" आणि "sierra leone" या दोन देशात ते पासपोर्ट,९ मोबाईल ,६ अंतरराष्ट्रीय सिमकार्ड६ भारतीय सिमकार्ड, काही बँकांचे सिमकार्ड,इत्यादी वस्तू जप्त करण्यात आले आहेत...तर महिलेचा दुसरा साथीदार "diaby amara" वय ३१ हा फरार झाला मात्र त्याच्या घरातून पोलीसांना २ लॅपटॉप,६ मोबाईल,३ अंतराष्ट्रीय सिमकार्ड,१ भारतीय सिमकार्ड,१ पासपोर्ट, विविध बँकांचे डेबिट कार्ड पोलीसांच्या हाती लागल्या आहेत. पोलिसांना खात्री आहे की ऑनलाईन फ्रॉड मध्ये फक्त हे दोघाच नसून एक मोठी टोळी यामागे सक्रिय असू शकते. ज्याचा तपास आता पोलीसांकडून केला जातोय.. तसेच पोलीसांनी लोकांना सुद्धा आव्हान केलं आहे की ज्यांच्या सोबत अशी फसवणूक झाली असेल त्यांनी पोलिस स्टेशनला येऊन तक्रार द्यावी जेणेकरून अशा भामट्यांना वेळेस आळा घालण्यास पोलिसांना मदत होईल.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा