देव तारी त्याला कोण मारी


SHARES

विक्रोळी - 'देव तारी त्याला कोण मारी' असा प्रकार विक्रोळी स्थानकात बुधवारी सकाळी घडला. दिनकर कोंडीबा सकपाळ (65) यांनी आजाराला कंटाळून विक्रोळी स्थानकात लोकलखाली येऊन जीव देण्याचा प्रयत्न केला. परंतु, सतर्क लोकलचालक आणि आरपीएफने त्यांना जीवनदान दिले. लोकलसमोर कुणी व्यक्ती रुळावर झोपली असल्याचा चालकाला दिसताच त्याने ब्रेक लावला. तोपर्यंत लोकलचा काही भाग त्यांच्या अंगावर जाऊन देखील ते सुखरूप होते. या वेळी कर्तव्यावर असलेल्या आरपीएफच्या अखिलेश सिंग या जवनाने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना आरपीएफ घाटकोपर चौकीत आणले. त्या ठिकाणी आरपीएफचे उपनिरीक्षक ब्रिजेश कुमार यांनी त्यांचे मार्गदर्शन केले आणि त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा