बनावट व्हिसा बनवणारी टोळी सक्रिय


बनावट व्हिसा बनवणारी टोळी सक्रिय
SHARES

जर तुम्ही परदेशात जाण्यासाठी कोणत्या एजन्सीचा विचार करताय... तर सावधान... ती एजन्सी तुमची फसवणूकही करू शकते. मुंबईतही अशीच एक टोळी सक्रिय आहे.  पोलिसांनी केलेल्या विशेष कारवाईत टुरिस्ट एजन्सीचा गैरकारभार उघड झालाय. मुंबई पोलिसांनी चार टुरिस्ट एजन्सीच्या कार्यालयांवर धाड टाकून २९६ पासपोर्ट आणि ३१ व्हिजा जप्त केले आहेत. याप्रकरणी एम आर ए मार्ग पोलिसांनी मुनावर शिरवत, सालेह कोटपरब्बील आणि विजय पाटील अश्या तिघांना अटक केलीय. या एजन्सी लाखो रुपये घेऊन वर्क व्हिसा काढण्याचं आश्वासन देत. प्रत्यक्षात मात्र टुरिस्ट व्हिसा काढत आणि त्यावर ते लोकांना परदेशी पाठवत. पण परदेशात जाताच व्हिसामधील टुरिस्ट दर्शवणा-या पानावर ते वर्क व्हिसाचं पान चिकटवत. पण इमिग्रेशन दरम्यान पकडले गेल्यानं कित्येकांना परदेशातल्या कारागृहाची वाट धरावी लागते.

कारवाई करण्यात आलेल्या एजन्सीस

1) सफर इंटरनॅशनल टूर अँड ट्रॅव्हल्स 

2) अबुबकर मंजिल

3) बंदे अली बिल्डींग

4) भाग्यश्री टूर्स अँड ट्रॅव्हल्स

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा