'ही' कारणे सांगत पोलिसांनी नोंदवला अर्णब गोस्वामीवर गुन्हा


'ही' कारणे सांगत पोलिसांनी नोंदवला अर्णब गोस्वामीवर गुन्हा
SHARES
प्रसार माध्यमांवर बातम्या देताना प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी रिपब्लिक भारत वृत्तवाहनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी  पायधुनी पोलिस ठाण्यात रविवारी दुसरा गुन्हा दाखल केला आहे. अर्णब यांनी वांद्रे येथे जमलेल्या मजुरांच्या गर्दीला धार्मिक रंग देण्याचा आरोप त्यांच्यावर तक्रारीत करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी अर्णब यांची एका गुन्ह्यात चौकशी केली होती. त्यानंतर अर्णब यांच्यावर अनोळखी व्यक्तींकडून हल्ला करण्यात आल्याचा प्रकार ही घडला होता.

मुंबईच्या वांद्रे स्थानकाजवळ 29 एप्रिल रोजी वाढवण्यात आलेल्या लाँकडाऊनला विरोध दर्शवत गर्दी केली होती. या परिस्थितीवर विश्लेशन करताना अर्णब गोस्वामी यांनी या प्रकरणात जमावाने धार्मिक स्थळाजवळच गर्दी का?  केल्याचा दावा केला होता. तसेच विशेष समुदायाचे नागरिकच का गर्दी करतात, अशा दावा केला होता. त्यामुळे या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप रझा अकादमीचे सचिव इरफान शेख यांनी करत पायधुनी पोलिसात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीवरून अर्णब विरोधात हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 153, 153(अ), 295(अ), 500, 505(2),511, 120(ब) 505(1)(ब)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोस्वामी यांच्यासह रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीच्या मालकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


काही दिवसांपूर्वीच अर्णब यांच्यावर ते घरी जात असताना अनोळखी व्यक्तींनी हल्ला केला होता. रिपब्लिकच्या स्टुडिओवरून ते घरी जात असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. अर्णब आणि त्याची पत्नी टोयोटा कारमधून घराच्या दिशेनं जात होते. त्यावेळी मुखवटा लावलेल्या गुंडांनी अर्णबच्या गाडीला ओव्हरटेक केलं. त्यानंतर त्यांच्या गाडीवर शाईनं भरलेल्या बाटल्या फेकत शिवीगाळ केली.  वेळीच अर्णबच्या सुरक्षा रक्षकांनी  हल्लेखोरांना पकडलं आहे. त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. 
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा