फळ विक्रेत्याची गोळी झाडून हत्या

  Mira Bhayandar
  फळ विक्रेत्याची गोळी झाडून हत्या
  मुंबई  -  

  काशीमीरा गावात राहणारे फळ विक्रेता श्यामू गौड यांची अज्ञातांनी गोळी मारून हत्या केली आहे. हल्लेखोर बाईकवरून आले होते आणि श्यामू यांच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडून पसार झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिस या सीसीटीव्हीच्या आधारे पुढचा तपास करत आहेत.

  गुरुवारी मध्यरात्री झालेली ही घटना जवळील इमारतीच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दोन अज्ञात हल्लेखोर बाईकवरून आले. दोघांपैकी एक श्याम गौड यांच्या घराजवळ जातो. त्याच्यामागोमाग दुसराही घराजवळ जातो आणि दरवाजा वाजवतो. श्याम यांनी दरवाजा उघडल्यावर त्यांचावर गोळीबार केला जातो. 

  रात्री २ वाजता दरवाजा ठोठावल्याचा आवाज आला होता. गोळीचा आवाज ऐकून आम्ही बाहेर आलो तेव्हा श्याम जखमी अवस्थेत पडला होता - श्याम गौड यांचे सासरे 

  श्याम काशीमीरा येथील अमर पॅलेस हॉटेल जवळ फळविक्रीचा व्यवसाय करायचा. श्यामला ४ लहान मुले आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत असुन या हत्येमागे काय कारण आहे, याचा पोलीस तपास करत आहेत. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.