मुंबईत गे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मुंबईत गे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मुंबईतील मालवणी पोलिसांनी या प्रकरणी ३ आरोपींना अटक केली आहे.

मुंबईत गे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
SHARES

मुंबईत गे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मुंबईतील मालवणी पोलिसांनी या प्रकरणी ३ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईनंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती हाती लागली आहे. हे रॅकेट ऑनलाइन डेटिंग गे अॅपच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवत होते. लोकांना ब्लॅकमेल केले जात होते.

या प्रकरणी ५ जणांनी धमकावून रोकड आणि एटीएम कार्ड हिसकावून घेतले. आरोपींनी त्या पीडित व्यक्तीचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले असल्याचं समजतं.

पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यात हायप्रोफाइल ग्राहकही आहेत. पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर या हायप्रोफाइल ग्राहकांवरही कारवाई केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी गे डेटिंग अॅपच्या माध्यमातून एका कंपनीच्या अकाउंटंटला जाळ्यात अडकवले होते. त्याच्याकडे प्रतितास १००० रुपयांची मागणी केली. सगळे काही ठरल्यानंतर पीडित त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचला. तिथे पोहोचल्यानंतर आधीच उपस्थित असलेल्या पाच जणांनी त्याला मारहाण केली.

त्याचा फोन, पाकीट आणि एटीएम हिसकावून घेतले. आरोपींनी त्याला धमकी देत पिन कोडची माहिती घेतली. त्यानंतर पीडित व्यक्तीचा व्हिडिओ तयार करण्यात आला. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायल करण्याची धमकी देण्यात आली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा