जोगेश्वरीत घरकाम करणाऱ्या तरुणीची आत्महत्या


जोगेश्वरीत घरकाम करणाऱ्या तरुणीची आत्महत्या
SHARES

मुंबईतील जोगेश्वरीमध्ये घरकाम करणाऱ्या एका तरुणाने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्योती पाटेकर (१९) असं या तरुणीचं नाव असून ओबेरॉय स्प्लेन्डर कॉम्प्लेक्स या इमारतीवरून तिनं उडी मारली. या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी ज्योतीचा अपघाती मृत्यू झाल्याची तक्रार नोंदवली आहे.


का केली आत्महत्या?

मिळालेल्या माहितीनुसार, ओबेरॉय स्प्लेन्डर कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये राहणाऱ्या बॅंक अधिकारी नितीन खन्ना यांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करत होती. त्यावेळी दोन दिवसांपूर्वी नितीन यांच्या मुलीचा वाढदिवस होता. त्यासाठी नितीन यांनी मुलीला वाढदिवसाचं गिफ्ट द्यायचं म्हणून चांदीचे शिक्के आणले होते. मात्र या शिक्क्यांमधील काही शिक्के हरवल्यानं नितीन यांच्या कुटुंबीयांनी तिच्यावर आरडाओरड केली. त्यामुळे ज्योतीनं आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मात्र, ज्योतीचा अपघाती मृत्यू झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलं असलं तरी ज्योतीनं आत्महत्या का केली? याचा तपास मेघवाडी पोलिस करत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा