खंडणीसाठी सहा वर्षाच्या मुलीचे अपहरण करणारे नराधम गजाआज


SHARE

10 लाखंच्या खंडणीसाठी मालकाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी सोमवारी सकाळी अटक केली होती. इम्रान शेख(24) आणि त्याला मदत करणाऱ्या अब्बास खान (36) या दोघांना पोलिसांनी पकडले असून,पोलीस अधिक तपास करत आहेत.ट्रॉम्बेतील चित्ता कॅम्प परिसरात राहणारे मोहम्मद इक्लाख शेख यांचा धारावी परिसरात कपडे तयार करण्याचा व्यवसाय आहे. शनिवारी सकाळी त्यांची सहा वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत असताना अचानक गायब झाली.  

आसपासच्या परिसरात शोध घेऊन देखील ती न सापडल्याने शनिवारी रात्री मुलीच्या कुटुंबियांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती.  दरम्यान, रात्री 1 च्या सुमारास अपहरणकर्त्याने मुलीच्या वडिलांना फोन करुन 10 लाखांची खंडणी मागितल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. मात्र रविवारी सकाळी अचानक अपहरण झालेली मुलगी धारावी परिसरात सापडली. पोलिसांनी मुलीची विचारपूस केली आणि तिला काही कर्मचाऱ्यांचे फोटो दाखवले. यावेळी मुलीने इम्रान शेख याचा फोटो ओळखला. मुलीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याच्यासह अजून एकाला अटक केली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या