एका तासात सोडवला अपहरणाचा गुन्हा

काही दिवसांपूर्वी मुलगी शेतात एकटी काम करत असताना ढगेने तिला धमकावून पळवून आणले. त्याने प्रथम मुलीला बीडच्या आष्ठी येथे नातेवाईकांकडे नेले. ढगेने मुलगी पळवून आणल्याचे कळाल्यानंतर नातेवाईकांनी त्याला हाकलून लावले.

एका तासात सोडवला अपहरणाचा गुन्हा
SHARES
मुंबईच्या वडाळा पोलिसांनी अवघ्या एका तासात मुलीच्या अपहरणाचा डाव उधळून लावत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. काकासाहेब ढगे (२०) असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अहमदनगर पोलिस करत असल्यामुळे आरोपीचा ताबा त्यांना दिला आहे.

धमकावून मुलीला पळवले

अहमदनगर मध्ये राहणारी पीडित मुलगी १५ वर्षाची आहे. आई-वडिलांचे लहानपणीच निधन झाल्यामुळे पीडित मुलगी तिच्या मावशीकडे राहत होती.  काही दिवसांपूर्वी मुलगी शेतात एकटी काम करत असताना ढगेने तिला धमकावून पळवून आणले. त्याने प्रथम मुलीला बीडच्या आष्ठी येथे नातेवाईकांकडे नेले. ढगेने मुलगी पळवून आणल्याचे कळाल्यानंतर नातेवाईकांनी त्याला हाकलून लावले. तेथे दोन आठवडे थांबल्यानंतर तो तिला घेऊन पोकरी अहमदनगर येथे नातेवाईंकांकडे गेला. तेथे तो महिनाभार राहिला.

नातेवाईकांना संशय

 पोकरीत त्याने लाकूड व्यवसाय सुरू केला होता. मात्र तेथेही नातेवाईकांना त्याच्यावर संशय आल्यानंतर त्याने तेथून मुलीला घेऊन पळ काढला. थेट त्याने पंढरपूर गाठले. त्या ठिकाणी तो मित्राच्या घरी दोन दिवस राहिला. त्यानंतर पुन्हा पोकरीला येऊन नातेवाईकांना गयावया करून थांबला. दहा दिवसानंतर तो मुलीला घेऊन मुंबईच्या वडाळा परिसरात आला. ही बातमी मुलीच्या घरातल्यांना कळाल्यानंतर त्यांनी रविवारी वडाळा पोलिस ठाण्यात येत पोलिस उपनिरीक्षक दत्ताराम कोकणे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ढगेने वडाळातील मिठाघर परिसरात मुलीला पळवून आणले असल्याचे सांगितले.
 

खबऱ्यांच्या मदतीने शोध


पोलिसांनी खबऱ्यांच्या मदतीने एका तासात ढगेचा शोध लावत त्याला पोलिस ठाण्यात आणले. पीडित मुलीचा ताबा तिच्या नातेवाईंकांना दिला असून ढगेचा ताबा पुढील तपासासाठी अहमदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तपासात ढगेने दोन लग्न केली असून दोन्ही बायका त्याला सोडून गेल्या असल्याचं उघडीकस आलं. त्याने मुलीच्या बालबुद्धीचा फाय़दा घेऊन तिला धमकवून पळवून आणल्याचे पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी सांगितले. मुलगी ताब्यात असताना आरोपीने तिच्यावर अत्याचार केले असल्याचा संशय असून त्यानुसार गुन्ह्यातील कलम वाढवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.मुलीच्या मावशीने मुलीच्या अपहरणाचा गुन्हा एप्रिलमध्ये नोंदवला होता. मात्र पोलीस कारवाईत चालढकलपणा करत होते. पण मुंबईच्या वडाळा पोलिसांनी गुन्ह्यांची गंभीर दखल घेऊन मुलीला परत मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभारी आहे.
 - पीडित मुलीची आई
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा