कुत्रा विव्हळत होता, पण तो लोखंडी दांड्यानं मारत राहिला, अखेर...

भटक्या कुत्र्याला मारत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली.

कुत्रा विव्हळत होता, पण तो लोखंडी दांड्यानं मारत राहिला, अखेर...
SHARES

गोरेगावमध्ये एका भटक्या कुत्र्याची मारून-मारून हत्या करण्याऱ्या ३१ वर्षांच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. एका पोलिस अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितलं की, ही घटना मंगळवारी घडली होती. ज्यानंतर आरोपीला बांगुर नगर पोलिसांनी अटक केली आहे.

भटक्या कुत्र्याला मारत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली. एका व्यक्तीनं याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत मुंबई पोलिस आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना टॅग केला. यानंतर गृहमंत्र्यांच्या निर्देशावर पोलिस सक्रिय झाले आणि बुधवारी आरोपीला अटक करण्यात आली.

ओरीपीचे नाव इमरान युनूस शाह असं आहे. तो एक सेल्समन म्हणून काम करतो. चौकशीदरम्यान त्यानं सांगितलं की, कुत्र्यानं त्याच्या बाइकचे सीट कव्हर फाडले होते. यानंतर त्याला त्यानं मारलं.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, व्हिडिओमध्ये लोखंडाच्या दांड्यानं कुत्र्याला मारले जात आहे. त्यानंतर कुत्रा रक्तभंबाळ झाल्याचं देखील दिसत आहे. यावेळी काहींनी विरोध केला. पण कुणी त्याला मारण्यापासून रोखलं नाही.  हेही वाचा

अनिल देशमुख यांना न्यायालयाचा दणका, गुन्हा रद्द करण्याच्या मागणीला स्थगिती

मुंबईतून २१ कोटींचं युरेनियम जप्त, एटीएसची कारवाई

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा