SHARE

गोरेगाव - टोपीवाला मंडईत उभ्या राहणा-या नवीन नाट्यगृहास जेष्ठ नाटककार प्रभाकर पणशीकर यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. गुरुवारी गटनेत्यांच्या बैठकीत प्रभाकर पणशीकर यांचं नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. जेष्ठ नाटककार प्रभाकर पणशीकर यांचं नाव या नाट्यगृहाला देण्याचा प्रस्ताव स्थानिक नगरसेवक राजू पाध्ये यांनी मांडला होता. या प्रस्तावावर गुरुवारी गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर प्रस्ताव मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव आता महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात आलाय.

टोपीवाला मंडईत 16 मजली इमारत बांधण्यात येणाराय. या वेळी मंडई आणि नाट्यगृह बांधण्याचा संयुक्त प्रस्ताव होता. 16 मजली इमारत बांधून त्यात तळमजल्यावर मंडई आणि चौथ्या मजल्यावर नवीन नाट्यगृह अशी पालिकेची योजना आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या