
आपण अनेक जणांचे अपघात किंवा ट्रेनमधून पडून मृत्यू झाल्याचे ऐकले असाल. पण पोलीस हवालदाराचाच ट्रेनमधून पडून मृत्यू झाल्याचे सांगितले तर तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरे वास्तव आहे. ही घटना कांजूरमार्ग स्थानकाजवळ घडली आहे. या अपघातात पोलीस हवालदार दत्तात्रेय पाटील यांचा मृत्यू झाला आहे. ते वडाळा जीआरपीत कार्यरत होते.
शुक्रवारी रात्री दत्तात्रेय शिंदे यांची रात्रपाळी होती. ते रात्री ९ च्या सुमारास कामावर येण्यासाठी कल्याण वरून गाडी पकडली. रात्री 10 च्या सुमारास गाडी कांजूरमार्ग स्थानकावरून येत असताना अचानक त्यांचा ट्रेनमधून तोल गेला आणि ते पडले. त्यावेळी ट्रेन वेगात असल्याने दत्तात्रय गंभीर जखमी झाले. तिथे असलेल्या पोलीस नाईक एस. व्ही कदम यांनी त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. जिथे 11 वाजून 2 मिनिटांनी दत्तात्रेय शिंदे यांना मृत घोषित करण्यात आले. शव विच्छेदनानंतर अंतिम विधीसाठी सध्या त्यांचं पार्थिव सोलापूरला नेण्यात आलं आहे.
हेही वाचा -
या अपघातात पोलीस हवालदार दत्तात्रेय पाटील यांचा मृत्यू झाला आहे. ते वडाळा जीआरपीत कार्यरत होते.
