आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी गुजरातचा उद्योगपती अटकेत

मुंबईच्या आझाद मैदान अंमली पदार्थ पथकाच्या युनिटने २७ डिसेंबरला वाकोला परिसरात चार जणांना अटक करत त्यांच्याजवळून १०० किलो ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारे रसायन ताब्यात घेतले होते.

आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी गुजरातचा उद्योगपती अटकेत
SHARES
आंतराष्ट्रीय अंमली पदार्थ बाजारात कोट्यावधी रुपयांच्या फेन्टानील ड्रग्जची तस्करी केल्याप्रकरणी मुंबईच्या अंमली पदार्थ पथकाने गुजरातच्या एका उद्योगपतीला अटक केली आहे. दिपक नटवरलाल मेहता असं या  उद्योगपतीचं नाव आहे. डिसेंबर महिन्यात वाकोल्यावरून १०० किलो ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारं रसायन पोलिसांनी हस्तगत केलं होतं. त्यानुसार पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपासात या उद्योगपतीचा सहभाग आढळून आला.


मेक्सिकोत डिलीव्हरी

मुंबईच्या आझाद मैदान अंमली पदार्थ पथकाच्या युनिटने २७ डिसेंबरला वाकोला परिसरात  चार जणांना अटक करत त्यांच्याजवळून १०० किलो ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारे रसायन ताब्यात घेतले होते. हे अंमली पदार्थ मेक्सिकोला बनावट कागदपत्रे तयार करून पाठवले जाणार होते. तपासात हे रसायन गुजरातच्या राजकोटमधील एका कंपनीतून आणण्यात आले असल्याचे निष्पन्न झाले. 


इटलीला ड्रग्ज पाठवले

त्यानुसार पोलिसांनी गुजरातच्या मेहता यांच्या कंपनीत जाऊन चौकशी केली. त्या वेळी कंपनीने या पूर्वीच इटलीला एका कंपनीला ४०० किलो ड्रग्ज पाठवल्याचे निष्पन्न झाल्यानंतर  पोलिसांनी कंपनीचे संचालक दिपक मेहता यांना गुरूवारी गुजरातहून अटक केली. या गुन्ह्यात अनेकांचा सहभाग पुढे येणार असून अटक आरोपींची संख्या वाढवण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.हेही वाचा  -
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा