वळूच्या धडकेत विद्यार्थी जखमी

दोन वळू तेथे एकमेकांना धडक देत धावत आले. त्यावेळी त्या वळूंनी अक्षयला जोरदार धडक दिल्यानंतर अक्षय जागेवरच कोसळला.

वळूच्या धडकेत विद्यार्थी जखमी
SHARES

मुंबईतल्या पवई परिसरात वळूने दिलेल्या जोरदार धडकेत आयआयटीचा विद्यार्थी जखमी झाला आहे. अक्षय प्रसन्न लाथा असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. त्याच्यावर विक्रोळीच्या सुश्रृषा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. परिसरातील सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. हे सीसीटिव्ही चित्रण सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेजागेवरच कोसळला

पवई आयआयटीमध्ये अक्षय हा इंटर्नशिप करत असून बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास तो होस्टेल परिसरात फोनवर बोलत उभा होता. त्यावेळी दोन वळू तेथे एकमेकांना धडक देत धावत आले. त्यावेळी त्या वळूंनी अक्षयला जोरदार धडक दिल्यानंतर अक्षय जागेवरच कोसळला. अक्षयच्या मदतीसाठी तात्काळ एक युवक धावत आला.  मात्र, अक्षय बेशुद्ध अवस्थेत पडला होता. वेळीच त्याला विक्रोळीच्या सुश्रृषा रुग्णालयात हलवले. सुदैवाने कसलीही गंभीर दुखापत त्याला झाली नाही. हेही वाचा -

प्रसिद्ध वकिल इंदिरा जयसिंह यांच्या घरावर सीबीआयचे छापे
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा