प्रसिद्ध वकिल इंदिरा जयसिंह यांच्या घरावर सीबीआयचे छापे

केंद्रीय गृह मंत्रालयाने लॉयर्स कलेक्टिववर या संस्थेचा परवाना ही रद्द केला होता. मात्र तरी ही लॉयर्स कलेक्टिववर या संस्थेच्या माध्यमातून आनंद यांनी परदेशी निधी स्विकारणे आणि एफसीआरएचं उल्लघंन केल्याची तक्रार सीबीआयला मिळाली.

प्रसिद्ध वकिल इंदिरा जयसिंह यांच्या घरावर सीबीआयचे छापे
SHARES

परदेशी योगदान नियमन कायद्याचे (एफसीआरए) उल्लंघन केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या वकील इंदिरा जयसिंह आणि आनंद ग्रोवर यांच्या मुंबई व दिल्ली येथील निवासस्थानी आणि कार्यालयावर सीबीआयने छापे टाकले आहेत. ही छापेमारी त्यांच्या लॉयर्स कलेक्टिव या स्वयंसेवी संस्थेच्या परदेशी निधी प्रकरणी केली आहे. या प्रकरणी सीबीआय अधिक तपास करत आहेत.


पहाटे ५ वाजल्यापासून छापा 

लॉयर्स कलेक्टिव ही स्वयंसेवी संस्था इंदिरा जयसिंह यांचे पती आनंद ग्रोवर चालवतात. त्यांच्या लॉयर्स कलेक्टिववर एफसीआरए कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने लॉयर्स कलेक्टिववर या संस्थेचा परवानाही रद्द केला होता. मात्र तरीही लॉयर्स कलेक्टिववर या संस्थेच्या माध्यमातून आनंद यांनी परदेशी निधी स्विकारणे आणि एफसीआरएचं उल्लघंन केल्याची तक्रार सीबीआयला मिळाली. त्यानुसार सीबीआयने आनंद ग्रोवर यांच्यासह इंदिरा यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सीबीआयने गुरूवारी जयसिंह यांच्या निजामुद्दीन येथे निवासस्थानी आणि कार्यालयावर तसेच जंगपूरा येथील स्वयंसेवी संस्थेचे कार्यालय आणि मुंबईतील कार्यालयावर पहाटे ५ वाजल्यापासून छापा मारला.


आरोप फेटाळले

सीबीआयने केलेले आरोप लॉयर्स कलेक्टिवने फेटाळून लावले आहेत. गृहमंत्रालयाच्या तक्रारीनुसार, लॉयर्स कलेक्टिवने २००६-०७ आणि २०१४-१५ दरम्यान ३२.३९ कोटी परदेशी निधी मिळवला. हा निधी एफसीआरए कायद्याचे उल्लंघन करून मिळवल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. इंदिरा जयसिंह आणि आनंद ग्रोवर देशातील प्रसिद्ध वकील म्हणून ओळखले जातात. इंदिरा जयसिंह २००९ ते २०१४ दरम्यान यूपीए सरकारच्या कार्यकाळात ॲडिशनल सॉलिसिटर जनरल पदावर होत्या. त्यांनी आपल्या पदाचा फायदा उठवत एफसीआरए कायद्याचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.हेही वाचा  -

२ वर्षांचा मुलगा पडला मॅनहोलमध्ये, ९ तास उलटले तरी शोध सुरूच

अभिनेत्री पल्लवी जोशीला सायबर चोरट्यांनी घातला गंडा

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा