अभिनेत्री पल्लवी जोशीला सायबर चोरट्यांनी घातला गंडा

बँकेत त्यांनी केलेल्या चौकशीत हे पैसे युरोपमधील टॅक्सी खर्च आणि खरेदीसाठी वापरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या प्रकरणात आंतरराष्ट्रीय सायबर चोरांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे.

अभिनेत्री पल्लवी जोशीला सायबर चोरट्यांनी घातला गंडा
SHARES

प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशीला सायबर चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. तिच्या आंतरराष्ट्रीय कार्डचा डाटा चोरून आरोपींनी युरोपात त्या पैशांचा वापर केला असल्याचे तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.


१२ हजार काढले

अंधेरी सात बंगला परिसरात राहणाऱ्या पल्लवी जोशी या राहतात. काही दिवसांपूर्वी पल्लवी या त्यांच्या कार्यालयात काम करत बसल्या असताना त्यांच्या मोबाइलवर एकसारखे मेसेज येऊ लागल्यामुळे त्यांनी मोबाइल पाहिला. तेव्हा मोबाइलवर पाच ते सहा मेसेज आले होते. त्याच्या खात्यातून युरो चलनाद्वारे पैसे काढण्यात आल्याचे ते मेसेज होते. खात्यातून अजून पैसे जाण्याआधीच पल्लवी यांनी बँकेत फोन करून खाते बंद केले. मात्र तोपर्यंत जोशी यांच्या खात्यातून १२ हजार रुपये काढण्यात आले होते.


आंतरराष्ट्रीय सायबर चोर

बँकेत त्यांनी केलेल्या चौकशीत हे पैसे युरोपमधील टॅक्सी खर्च आणि खरेदीसाठी वापरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या प्रकरणात आंतरराष्ट्रीय सायबर चोरांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी पोलिसांनी बँकेकडे या व्यवहाराबाबत माहिती मागवली असून त्या माहितीच्या आधारे पोलिस पुढे तपास करणार आहे.हेही वाचा -

रियाज भाटीला बनावट कागदपत्रे आणि स्वाक्षरी देणारा अटकेत

चर्नीरोड स्थानकातील मोबाइल चोरीप्रकरणी जुळ्या भावांना अटक
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा