रियाज भाटीला बनावट कागदपत्रे आणि स्वाक्षरी देणारा अटकेत

भाटीच्या चौकशीत त्याने ही कागदपत्रे नदीमकडून बनवून घेतल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी नदीमला नवी मुंबईतून अटक केली. नदीम हा बनावट कागदपत्रे आणि हस्ताक्षर तज्ज्ञ म्हणून ओळखला जातो.

रियाज भाटीला बनावट कागदपत्रे आणि स्वाक्षरी देणारा अटकेत
SHARES

बनावट सही आणि कागदपत्रांच्या मदतीने क्रिकेट असोसिएशनचे सदस्यतत्व मिळवणाऱ्या रियाझ भाटीला मदत करणाऱ्यास मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. नदीम अन्सारी असे या आरोपीचे नाव आहे. नदीमनेच काॅलेज विश्वस्तांची हुबेहूब स्वाक्षरी केल्याचे तपासात पुढे आले आहे.


दाऊदच्या नावाने धमकी

बनावट कागदपत्रे बनवणे त्यावरील विश्वस्तांच्या  हुबेहूब स्वाक्षऱ्या मारण्यात नदीमचा हातखंडा होता. काही दिवसांपूर्वीच रियाजने मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) चे सदस्यत्व मिळवण्यासाठी नदीमकडून काॅलेजची बनावट कागदपत्रे आणि त्यावर काॅलेजच्या विश्वस्तांची स्वाक्षरी मारून घेतली होती. सदस्यत्व मिळाल्यानंतर रियाजने खेळाडूंसोबत परदेशी दौराही केला. ही बाब संबंधीत काॅलेज प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर कॉलेज विश्वस्तांनी या प्रकरणी रियाज भाटीच्या विरोधात हरकत घेण्यासाठी पाऊले उचलली. याची माहिती मिळताच रियाजने कॉलेज विश्वस्तांना कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देण्यास सुरुवात केली. याप्रकरणी मुंबई खंडणी विरोधी पथकाने रियाज भाटीविरोधात गुन्हा दाखल करत भाटीला अटक केली.


हस्ताक्षर तज्ज्ञ

भाटीच्या चौकशीत त्याने ही कागदपत्रे नदीमकडून बनवून घेतल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी नदीमला नवी मुंबईतून अटक केली. नदीम हा बनावट कागदपत्रे आणि हस्ताक्षर तज्ज्ञ म्हणून ओळखला जातो. या कामासाठी भाटीने नदीमला बक्कळ पैसे दिले होते. नदीमने या पूर्वीही बँक कर्जासाठी अनेकांकडून पैसे घेऊन कागदावर खोट्या स्वाक्षऱ्या करून दिल्या होत्या. त्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल असून त्याला यापूर्वीही पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली होती.



हेही वाचा -

चर्नीरोड स्थानकातील मोबाइल चोरीप्रकरणी जुळ्या भावांना अटक

एका तासात सोडवला अपहरणाचा गुन्हा




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा