चर्नीरोड स्थानकातील मोबाइल चोरीप्रकरणी जुळ्या भावांना अटक

दरवेळी पोलिसांनी या दोघांपैकी एकाला पकडल्यास दोघेही एकमेकांची नावे सांगून पोलिसांना गुंगारा द्यायचे. या गुन्ह्यातही हे दोघे पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, या वेळी त्यांची ही युक्ती कामाला आली नाही.

चर्नीरोड स्थानकातील मोबाइल चोरीप्रकरणी जुळ्या भावांना अटक
SHARES
मुंबईच्या चर्नीरोड स्थानकात मोबाइल चोराला पकडताना धावत्या लोकलमधून पडलेल्या ५३ वर्षीय शकिल शेख यांचा रविवारी मृत्यू झाला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी दोन जुळ्या भावांसह एका महिलेला अटक केली आहे. धूम ३ चित्रपटाप्रमाणे हे दोन्ही आरोपी एकमेकांची ओळख लपवून पोलिसांना गुंगारा द्यायचे.


सीसीटिव्ही चित्रण व्हायरल 

नालासोपाराच्या संतोष नगर झोपडपट्टीत राहणारा मुख्य आरोपी शिवम कृष्णासिंह याचे मोबाइल चोरतानाचे सीसीटिव्ही चित्रण व्हायरल झाले होते. या घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे पोलिसही कामाला लागले होते. त्याच वेळी वांद्रे पोलिसांनी सत्यम कृष्णा सिंह याला संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्यावेळी सत्यमने तो मी नसून माझा भाऊ असल्याचे सांगत पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्यमकडून माहिती मिळताच पोलिसांनी नालासोपारा येथून शिवमला अटक केली. पोलिसांसमोर दोघेही उभे राहिल्यानंतर दोघांनी गुन्ह्यांची कबुली दिली.


वडीलही कारागृहात 

हे दोघेही अल्पवयीन असल्यापासून चोऱ्या करत असून यातील  शिवमवर १७ तर सत्यमवर ४ गुन्ह्यांची नोंद आहे. दरवेळी पोलिसांनी या दोघांपैकी एकाला पकडल्यास दोघेही एकमेकांची नावे सांगून पोलिसांना गुंगारा द्यायचे. या गुन्ह्यातही हे दोघे पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, या वेळी त्यांची ही युक्ती कामाला आली नाही. अल्पवयीन असल्यामुळे या दोघांची जामिनावर मुक्तता व्हायची. शिवम हा ४ महिन्यांपूर्वीच चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून आला आहे. तर सत्यम ९ महिन्याची शिक्षा भोगून आला आहे. विशेष म्हणजे या दोघांचे वडीलही अंमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी कोल्हापूर कारागृहात शिक्षा भोगत आहेत. शकिल यांचा मोबाइल या दोघांनी मस्जिद बंदर येथील फैरूजा खान या महिलेला विक्रीसाठी दिला होता. त्यामुळे पोलिसांनी तिलाही या प्रकरणात अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त पुरूषोत्तम कराड यांनी दिली.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा