मोबाइल चोराला पकडण्याच्या प्रयत्नात ५३ वर्षीय प्रवाशाचा मृत्यू

लोकलमधील मोबाइल चोराचा पाठलाग करताना ५३ वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना पश्चिम रेल्वेच्या चर्नी रोड स्थानकात घडली आहे. शकील अब्दुल गफार शेख असं या प्रवाशाचं नाव असून रविवारी ही घटना घडली आहे.

SHARE

लोकलमधील मोबाइल चोराचा पाठलाग करताना ५३ वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना पश्चिम रेल्वेच्या चर्नी रोड स्थानकात घडली आहे. शकील अब्दुल गफार शेख असं या प्रवाशाचं नाव असून रविवारी ही घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी अद्याप फरार असून चर्चगेट रेल्वे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मोबाइल हिसकावला

शकिल शेख हे जोगेश्वरी इथं राहणारे असून त्यांनी चर्चगेटला जाण्यासाठी रविवारी पहाटेच्या सुमारास लोकल पकडली. रविवार आणि त्यातच सकाळची वेळ असल्यानं लोकलमध्ये फारसी गर्दी नव्हती. त्यावेळी लोकल सकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास चर्नी रोड स्थानकात पोहोचताच आरोपीनं शकील यांचा मोबाइल हिसकावून धावत्या लोकलमधून पळ काढला.

प्लॅटफॉर्मवर उडी

त्यावेळी शकील यांनी चोराचा पाठलाग करण्याचा प्रयत्नात प्लॅटफॉर्मवर उडी मारली. परंतु, लोकलनं वेग घेतल्यानं त्यांना लोकलच्या वेगाचा अंदाज न आला नाही. त्यामुळं त्यांचा प्लॅटफॉर्म आणि लोकल यांच्या पोकळीत चेंगरून जागीच मृत्यू झाला.हेही वाचा -

मुंबईत मंगळवारी मुसळधार पावसाचा इशारा

झारखंडमधील तरुणाच्या मृत्यूचे पडसाद मुंबईत, पोलिसांनी घेतली खबरदारीसंबंधित विषय
ताज्या बातम्या