झारखंडमधील तरुणाच्या मृत्यूचे पडसाद मुंबईत, पोलिसांनी घेतली खबरदारी

झारखंडमध्ये मृत्यू झालेल्या तरबेज अन्सारीच्या नावाने सोशल मिडियावर टिक टाँक व्हिडिओच्या तरुणांची माथी भडकवत, दोन धर्मामध्ये तेढ निर्माण केले जात आहे.

झारखंडमधील तरुणाच्या मृत्यूचे पडसाद मुंबईत, पोलिसांनी घेतली खबरदारी
SHARES

मोटारसायकलची चोरी केल्याच्या आरोपावरून झारखंडमध्ये २२ वर्षीय तरुणाला जमावाकडून मारहाण करण्यात आली होती. यात गंभीर जखमी झालेल्या तरबेज अन्सारीचा आठ दिवसानंतर रुग्णालयात मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला धार्मिक ओढलावत सोशल मिडियावर नागरिकांची माथी भडकवणार्यां टिक टाँक फेम फैजल शेखसह चौघांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहेे.


टिक टाँक व्हिडिओ पडला महागात...

झारखंडमध्ये मृत्यू झालेल्या तरबेज अन्सारीच्या नावाने सोशल मिडियावर टिक टाँक व्हिडिओ फैजल आणि त्याच्या मिञांनी बनवून तो सर्वञ वायरल केला.  तरुणांची माथी भडकवत, दोन धर्मामध्ये तेढ निर्माण केले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकार्याने दिलेल्या तक्रारीवरून लोकमान्य टिळक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. माञ हा व्हिडिओ जाणून बुजून वायरल केला जात असल्याचे पुढे आल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी या प्रकरणी तो व्हिडिओ वायरल करणार्यांविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस अधिक तपास करत आहेत.


नेमकं प्रकरण

मोटर सायकल चोरी प्रकरणी जमावाला तरबरेज अन्सारीला जमावाने पकडले.  तो  तावडीत सापडल्यानंतर वीजेच्या खांबाला बांधून त्याला मारहाण करण्यात आली. तसेच त्याला त्याचा धर्म विचारण्यात आला आणि त्याला 'जय श्रीराम' आणि 'जय बजरंगबली' असे म्हणायला सांगितले होते, असा अन्सारीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. मारहाणीची ही घटना झारखंड येथील सरायकेला-खरसावा जिल्ह्यातील धाटकीडीह गावात घडली. झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी याप्रकरणी विशेष समिती स्थापन केली असून, या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक ही केली. 
Read this story in हिंदी
संबंधित विषय