मुंबईत मंगळवारी मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागानं पुढील २४ तसांत मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवत मुंबईकरांना सर्तक राहण्याचा इशारा दिला आहे.

SHARE

मुंबईसह उपनगरात सोमवारी पावसानं जोरदार हजेरी लावली असून मंळवारी देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. त्याशिवाय हवामान विभागानं पुढील २४ तसांत मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवत मुंबईकरांना सर्तक राहण्याचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणं, मुंबई पोलिस आयुक्तांनी देखील ट्विटरद्वारे मुंबईकरांना सावधान राहण्याचं आव्हान केलं आहे.

जनजीवन विस्कळीत

मुंबईत आतापर्यंत ७१५.१ मीमी. पाऊस पडला असून, उपनगरात ११६३.१ पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची तर मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. पावसामुळं मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं असुन, रेल्वेसेवेवर देखील याचा परिणाम होत आहे. प्रवाशांना अनेक अडचणींचा समाना करावा लागत आहे.

रस्ते पुर्णपणे बंद

मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचत असल्यानं रस्ते देखील पुर्णपणे बंद होत आहेतकोकण, गोवासह उत्तर महाराष्ट्रातील काही भागात देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आगामी ४८ तास महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर पावसाबरोबरच वाऱ्यांचा वेगही जास्त राहणार असल्यानं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.हेही वाचा -

मंगळवारी होणार रिक्षाचालकांचा संप अखेर मागे

बेस्टच्या भाडेकपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरूसंबंधित विषय
ताज्या बातम्या