१७ तासांच्या चौकशीनंतर भारतीच्या पतीलाही अटक

प्रसिद्ध काॅमेडियन भारती सिंह हिला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केल्यानंतर भारतीचा पती हर्ष लिंबाचीया यालासुद्धा एनसीबीने तब्बल १७ तासांच्या चौकशीनंतर अटक केली आहे.

१७ तासांच्या चौकशीनंतर भारतीच्या पतीलाही अटक
SHARES

प्रसिद्ध काॅमेडियन भारती सिंह हिला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केल्यानंतर भारतीचा पती हर्ष लिंबाचीया यालासुद्धा एनसीबीने तब्बल १७ तासांच्या चौकशीनंतर अटक केली आहे. भारती आणि हर्ष यांची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर दोघांनाही हॉलिडे कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

एका ड्रग पेडलरने दिलेल्या माहितीनंतर एनसीबीच्या पथकाने शनिवारी सकाळी भारती सिंहचं अंधेरी, लोखंडवाला काॅप्लेक्स येथील घर आणि कार्यालयावर धाड टाकली होती. या धाडीत एनसीबीच्या पथकाला भारतीच्या घरात गांजा आढळून आला होता. 

भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचीया या दोघांनीही गांजा बाळगल्याचं मान्य केल्यानंतर भारतीला अटक करण्यात आली. तर हर्ष याची एनसीबीने १७ तास कसून चौकशी केली आणि त्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली.

हेही वाचा- प्रसिद्ध काॅमेडियन भारतीला ड्रग्जप्रकरणी अटक

भारतीच्या घरात एकूण ८६.५ ग्रॅम गांजा सापडला आहे. हा गांजा एनसीबीच्या पथकाने जप्त केला आहे. याआधी एनसीबीने भारती सिंहला याप्रकरणी समन्स देखील बजावलं होतं.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर अंमली पदार्थ विरोधी पथक बाॅलिवूड कलाकारांच्या पाठिमागे हात धुवून लागलेलं आहे. याआधी देखील टीव्ही कलाकार सनम जोहर आणि अबीगैल पांडे, बाॅलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल, निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्या घरात एनसीबीने छापेमारी केली होती. 

सोबतच एनसीबीने खारदांडा परिसरातही शनिवारी छापा टाकला होता. या छाप्यात एका २१ वर्षीय दलालाला पकडण्यात आलं असून त्याच्याकडे एलसीडीच्या १५ डब्या, ४० ग्रॅम गांजा तसंच निट्राझेपाम या प्रतिबंधित अमली पदार्थांचा साठा सापडला आहे.  

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा