Advertisement

प्रसिद्ध काॅमेडियन भारतीला ड्रग्जप्रकरणी अटक

प्रसिद्ध काॅमेडियन भारती सिंहला अंमली पदार्थ विरोधी पथकाने (ncb) ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे.

प्रसिद्ध काॅमेडियन भारतीला ड्रग्जप्रकरणी अटक
SHARES

प्रसिद्ध काॅमेडियन भारती सिंहला अंमली पदार्थ विरोधी पथकाने (ncb) ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. एनसीबीच्या पथकाने शनिवारी सकाळी भारती सिंहचं घर आणि कार्यालयावर धाड टाकली होती. या धाडीत एनसीबीच्या पथकाला भारतीच्या घरात गांजा आढळून आला आहे. 

भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचीया या दोघांनीही गांजा बाळगल्याचं मान्य केल्यानंतर भारतीला अटक करण्यात आली आहे. तर हर्ष याची या प्रकरणी चौकशी सुरू आहे. भारतीच्या घरात सापडलेला गांजा एनसीबीच्या पथकाने जप्त केला आहे. 

भारतीच्या घरात एकूण ८६.५ ग्रॅम गांजा सापडला आहे. एका ड्रग पेडलरने दिलेल्या माहितीनंतर भारतीला ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानंतर ही छापेमारी करण्यात आली होती. छाप्यात गांजा आढळून आल्यानंतर तिला अटक करण्यात आली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर अंमली पदार्थ विरोधी पथक बाॅलिवूड कलाकारांच्या पाठिमागे हात धुवून लागलेलं आहे. याआधी देखील टीव्ही कलाकार सनम जोहर आणि अबीगैल पांडे, बाॅलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल, निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्या घरात एनसीबीने छापेमारी केली होती. 

सद्यस्थितीत भारती द कपिल शर्मा शो आणि एका डान्स रियालिटी शोमध्ये पती हर्ष लिंबाचीयासोबत काम करत आहे. ‘द ग्रेड इंडियन कॉमेडी शो’ या स्पर्धेतून भारतीने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘कॉमेडी सर्कस’, ‘कॉमेडी सर्कस के सुपरस्टार’, ‘कॉमेडी सर्कस का जादू’ यांसारख्या अनेक स्टँडअप कॉमेडी शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. याशिवाय ती नच बलिए, झलक दिखला जा, ‘एफ. आय. आर.’, ‘बिग बॉस’, ‘अदालत’, ‘खिलाडी 786’, ‘सनम रे’ यांसारख्या अनेक मालिका आणि चित्रपटांमध्येही झळकली आहे. भारतीने २०१७ मध्ये हर्ष लिंबाचीयासोबत लग्न केलं होतं.  

(comedian bharti singh arrested by ncb after marijuana found at her home)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा