SHARE

बोरीवली - बोरीवली रेल्वे स्टेशनवर आरपीएफच्या जवानांनी एका मोबाईल चोराला अटक केली आहे. शनिवारी संध्याकाळच्या समुारास जीवाराम प्रजापती हे प्लॅटफॉर्म नंबर 1 वरुन जाणारी चर्चगेट गाडी पकडत होते. ट्रेन मध्ये चढत असताना त्यांच्या मागोमाग एक युवक देखील गाडीत चढला आणि त्याने प्रजापतींच्या खिशातील मोबाईल काढला. हे सर्व प्रकार आरपीएफ च्या जवानांनी पाहिला. त्यांनी धावतच त्या चोराला पकडले. नंतर त्या चोराला बोरीवलीच्या आरपीएफ कार्यालयात घेऊन गेले, तेव्हा त्याच्याकडे प्रजापतींचा सापडला. चोराला पोलिसांनी अटक केली. पोलीस तपासात आरोपीचं नाव रविंद्र लाल सिंह ठाकुर असल्याचं आणि तो दहिसरमध्ये राहत असल्याचं समोर आले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या