आ. अमित साटम यांची जुहूत फेरीवाल्यांना मारहाण, पोलिसांनाही शिवीगाळ


आ. अमित साटम यांची जुहूत फेरीवाल्यांना मारहाण, पोलिसांनाही शिवीगाळ
SHARES

‘सबका साथ, सबका विकास’ म्हणत केंद्रातील मोदी सरकारसोबत राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने कारभार हाकायला सुरूवात केली. पण या सरकारमधील ‘लोक’प्रतिनिधी म्हणवल्या जाणाऱ्या आमदारांनाच जणू पक्षाच्या ‘ब्रीदवाक्याचा’ (टॅगलाईन) विसर पडलेला दिसून येत आहे. भाजपाचे आमदार अमित साटम यांनी गुरूवारी मिठीबाई काॅलेजसमोरील फेरीवाल्यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार हेच दर्शवत आहे. याप्रकरणी तक्रारदार फेरीवाल्यांनी जुहू पोलीस ठाण्यात लिखित अर्ज करून आ. साटम आणि त्यांच्या ४ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवत कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र यावर स्पष्टीकरण देताना आ. साटम यांनी आपण केलेली कृती योग्यच असल्याचा दावा केला आहे.



फेरीवाल्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जानुसार, दोन अनोळखी व्यक्ती मागील काही दिवसांपासून आ. साटम यांच्या नावाने हप्ता मागत होते. हप्ता न दिल्यास वाईट परिणाम होतील, अशी धमकीही ते देत होते. आ. साटम गरीब फेरीवाल्यांकडून हप्ता का मागतील? असे वाटल्याने या फेरीवाल्यांनी त्यांना हप्ता देण्यास नकार दिला.

त्यातच गुरूवारी दुपारी दोन अडीच वाजण्याच्या सुमारास चार अनोळखी व्यक्तींनी पुन्हा आ. साटम यांच्या नावे हप्ता मागण्यास सुरूवात केली. त्यांनाही हप्ता देण्यास नकार दिल्यानंतर अंदाजे २० मिनिटांनी आ. साटम स्वत: घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या चार कार्यकर्त्यांनी मिळून फेरीवाल्यांना शिवीगाळ करत मारहाण केली.

यादरम्यान आ. साटम यांनी महापालिकेची गाडी बोलावून फेरीवाल्यांचे सामान जबरदस्तीने त्यात टाकले. एवढेच नव्हे, तर स्थानिक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला शिवराळ भाषेत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सांगितले, असा आरोप या आठ तक्रारदार फेरीवाल्यांनी आ. साटम यांच्यावर केला आहे.


घटनेनंतर साटम यांनी केलेला खुलासा बघा -

 


मी केलेलं कृत्य हे योग्यच होतं. माझा राग, संताप फेरीवाल्यांविरोधात होता. मी पोलिसांना कोणताही अपशब्द वापरला नाही. पोलिसांना शिवीगाळ केली नाही. जे काही अपशब्द माझ्या तोंडून बाहेर पडले तो संतापाचा उद्रेक होता. पोलीस अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत नाहीत म्हणून मला रस्त्यावर उतरावं लागलं. फेरीवाल्यांची लॉबी आहे आणि ही लॉबी माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करतेय. मी कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. पोलीस माझ्यावर गुन्हा दाखल करणार असतील, तर मुंबईच्या पोलीस आयुक्तांना माझी विनंती आहे की सगळ्यात पहिले पुन्हा मुंबईचे पोलीस उपायुक्त परमजित दहिया आणि इथल्या वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर यांच्यावर कोर्टाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करावा.
- अमित साटम, भाजपा आमदार


यावर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांची प्रतिक्रिया

 


मागच्या आठवड्यात सिलेंडरचा स्फोट होऊन सहा लोकांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले होते. मी ज्या फेरीवाल्यांचे धंदे बंद करण्याचा प्रयत्न केला तेही रस्त्यावर अन्नपदार्थ शिजवणार होते. त्यांच्याकडेही गॅस सिलेंडर अवैध पद्धतीने हाताळले जात होते, असे आ. साटम म्हणाले.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा