हायकोर्टाचे नियम कागदावरच

 Kurla
हायकोर्टाचे नियम कागदावरच

कुर्ला - हायकोर्टाचे नियम धाब्यावर बसवून कुर्ल्यात फटाकेविक्री सुरू आहे. हायकोर्टाच्या नियमांप्रमाणे रहदारीच्या ठिकाणी फटाके विकण्यास मनाई आहे. सिलेंडर, शेगडी अशा वस्तूंचा साठा असेल, अशा ठिकाणापासून 100 मीटर अंतरातही फटाके विकण्यास मनाई आहे. पण यातला एकही नियम इथे पाळला जात नाहीये. कुर्ला पश्चिमेकडील स्टेशन रोड, आशिष टॉकीजजवळ सर्रास फटाके विकण्यात येतायत. मात्र यातील कोणताही नियम माहिती नसल्याचं महाराष्ट्र स्टोअर्सचे प्रवीण जैन यांनी सांगितलं.

Loading Comments