मुंबई पोलिसांच 'ऑपरेशन मुस्कान', जाणून घ्या मोहिमेसंदर्भात सर्व माहिती

१ जूनपासून महिनाभर शहरात ‘ऑपेरेशन मुस्कान’ राबवणार आहेत.

मुंबई पोलिसांच 'ऑपरेशन मुस्कान', जाणून घ्या मोहिमेसंदर्भात सर्व माहिती
(File Image)
SHARES

18 वर्षांखालील हरवलेल्या मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी १ जूनपासून महिनाभर शहरात ‘ऑपेरेशन मुस्कान’ राबवणार आहेत. या ऑपरेशनदरम्यान हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यात येणार आहे.

हरवलेल्या मुलांचा शोध घेऊन त्याच्या पालकांपर्यंत पोहचवणे हे कठीण असते. कित्येकदा बेपत्ता मूल सापडल्यावर पालक पोलिसांना कळवत नाहीत. काही मुले ही घरातून पळून आल्यावर निवारा म्हणून रस्त्यावर राहतात. तेथे राहल्यावर ते व्यसनाच्या आहारी जातात.

कित्येकदा मुले घरचा पत्ताही सांगत नाहीत. अशा वेळी मुलांना विश्वासात घेऊन त्याची विचारपूस करावी लागते. बेपत्ता मुलांचे वाढते प्रमाण पाहता मुंबई पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ ही मोहीम हाती घेतली आहे. संपूर्ण महिनाभर पोलिस शहरात ‘ऑपरेशन मुस्कान’ राबवणार आहेत.

‘ऑपेरेशन मुस्कान’दरम्यान जास्तीत जास्त बेपता मुलाचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मुलांना भिक्षा मागायला लावतात अशी ठिकाणे पोलीस शोधून काढणार आहेत. तसेच काही रेल्वे स्थानक परिसरात मुले भिक्षा मागताना आढळून येतात अशा रेल्वे स्थानकांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. जर 18 वर्षांखालील कोणी मूल हे घरकामदेखील करत असल्यास त्याची माहिती 100 किंवा 1098 वर कळवण्यात यावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

मुंबई पोलिसांनी अधिकृत निवेदनात नमूद केले आहे की, या मोहिमेच्या यशस्वितेसाठी मुंबईतील नागरिकांनी पोलिसांना आणि मुलांच्या सुटकेसाठी काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांना मदत केल्यास जास्तीत जास्त हरवलेल्या किंवा अपहरण झालेल्या मुलांचा शोध घेण्यास मदत होईल.

कारवाईदरम्यान रेल्वे स्थानक, बसस्थानक, रस्त्यावर, भीक मागताना किंवा कचरा गोळा करताना किंवा प्रार्थनास्थळे, रुग्णालये, हॉटेल किंवा दुकाने आदी ठिकाणी लहान मुले आढळून आल्यास नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला कळवावे.



हेही वाचा

Sakinaka Rape-Murder Case : साकीनाका बलात्कार प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा

सावधान! अदानी इलेक्ट्रिसिटीच्या नावानं बनावट मेसेज पाठवणाऱ्या टोळीचा सुळसुळाट

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा