'हिंदमाता'च्या मालकाला अटक


'हिंदमाता'च्या मालकाला अटक
SHARES

कोणतंही सामन आयात केलेलं नसताना बनावट बिलं तयार करून ६ हजार कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी ईडी (सक्तवसुली संचालनालय)ने 'हिंदमाता थिएटर'चा मालक संजय जैन याला अटक केली. या प्रकरणातील आणखी दोन आरोपींना ईडीने यापूर्वीच अटक केली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही फरार आहे.


'अशी' केली अटक

या प्रकरणी जबाब नोंदवून घेण्यासाठी ईडीने जैन याला सोमवारी आपल्या कार्यालयात बोलावलं होतं. त्यानंतर त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली. ईडीने २ वर्षांपूर्वी या प्रकरणातील आरोपींविरोधात एफआयआर (प्रथम माहिती अहवाल) दाखल केला होता.


६ हजार कोटी परदेशात पाठवले

सराफा व्यवसाय करणाऱ्या योगेश्वर डायमंड्स, चारभुजा डायमंड्स आणि कनिका जेम्स या तीन कंपन्यांनी २ वर्षांपूर्वी परदेशातून कोणतंही सामान आयात न करता बनावट बिल तयार करून ६ हजार कोटी रुपये परदेशात पाठवले.

ईडीने केलेल्या तपासात आरोपींनी आयात वस्तूंचं बनावट बिल बँकांमध्ये जमा करून बँकांचीही फसवणूक केल्याची माहिती उघडकीस आली आहे. नियमांचं उल्लंघन करून परदेशात पाठवलेला पैसा 'काळेधन' असू शकते, अशी माहिती ईडीने समोर आणली. जैनवर आयात वस्तूंचं बनावट बिल तयार करण्याचा आरोप आहे. जैनच्या विरोधात मनी लॉन्ड्रिग (पीएमएलए) कायद्यातील कलम १९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


यापूर्वी दोघांना अटक

यापूर्वी ईडीने याप्रकरणी स्कायलाइट्ल लिमिडेटचे संचालक पंडित सौरभ आणि कनिका जेम्स तसेच कंपनीचा माजी संचालक अनिल चोखरा यांना अटक केली आहे. पण या प्रकरणातला मुख्य आरोपी विजय कोठारी अजूनही फरार आहे. तो दुबई किंवा हाँगकाँगमध्ये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोठारीच्या विरोधात यापूर्वीच 'लूकआऊट नोटीस' जारी करण्यात आली होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा