वरळीत सापडले साप

वरळी - चक्क फणा काढलेले चार नाग वरळीच्या रस्त्यावर मंगळवारी रात्री 12.30 च्या सुमारास दिसले, त्यामुळे नागरिकांनी तात्काळ पोलिसांना बोलावलं. या वेळी पोलीस दलातीलच सर्पमित्र मुरलीधर जाधव यांच्या मदतीनं चार सापांमधील दोन सापांना पकडण्यात आलं. तर दोन साप पळून गेले. हे साप स्पेक्टेकल जातीचे असून अत्यंत विषारी असल्याचं सर्पमित्र जाधव यांनी सांगितलं. यामधील मादी साप पाच फुटांची आहे. तर नर चार फुटांचा आहे. सध्या या दोघांनाही वन अधिकाऱ्यांच्या हवाली करण्यात आलंय. मात्र दोन साप पसार झाल्यानं नागरिकांना सावध रहाण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय.

Loading Comments