SHARE

पालघर जिल्ह्यातील नालासोपारामध्ये गॅलेक्सी हॉटेलच्या कॅशियरला गोळी घालून दोन जण फरार झाल्याची घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यामध्ये कॅशियर दिलीप यादवच्या छातीत गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अज्ञात व्यक्ती लाल रंगाच्या मोटार-सायकलवरून आले आणि कॅशियरला गोळी घालून फरार झाले. तीन महिन्यांपूर्वीच 25 लाखांच्या हफ्त्यासाठी सुरेश पुजारी याने हॉटेलच्या मालकाला फोन केला होता. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंदवण्यात आला होता. त्यामुळे सुरेश पुजारीच्या टोळीकडूनच हा गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. सध्या पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच अनेक ठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात आली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या