ही कसली मुजोरी ?

पवई - पवई तलावात हाऊसबोट उलटून झालेल्या अपघातात तीन जणांना जीव गमवावा लागल्यानंतर मुंबई महापालिकेने या तलावात बोटींग करण्यास तसंच मासेमारी करण्यास मनाई केली आहे. तरीही तलावात जाण्यापासून रोखल्याच्या कारणास्तव न्यूटन जोशवा या व्यक्तीने महाराष्ट्र स्टेट अँगलिंग असोशियनचा कर्मचारी इम्रान शेख याला बेदम मारहाण केली. सर्व मारहाण सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या वेळी न्यूटनने या कर्मचाऱ्याच्या अंगावर सोबत आणलेले कुत्रे सोडण्याचाही प्रयत्न केला. न्यूटन हा या तलावात अनधिकृत हाऊसबोट चालवत होता आणि 23 डिसेंबरच्या रात्री जी दुर्घटना घडली ती हाऊसबोटही न्यूटन जोशवा याची असल्यानं महाराष्ट्र अँगलिंग असोशियननं न्यूटन जोशवा याचे सदस्यत्त्व रद्द केले होते. त्याचा रागही त्याच्या मनात होता. त्याचाच राग या कर्मचाऱ्यावर काढण्यात आला.

असोसिएशनचा पदाधिकारी असलेल्या जलालद्दीन काझी यालाही न्यूटनने फोनद्वारे धमकी दिली होती. दोन्ही प्रकरणात पोलिसांनी अदाखलपात्र गुन्हा नोंदवलाय. मात्र दखलपात्र गुन्हा असताना पोलीस न्यूटनला पाठिशी घालत असल्याचा आरोप असोसिएशनने केलाय. पवई पोलीस कुणाच्या दबावाखाली बघ्याच्या भूमिकेत गेले आहे? दोषींवर कारवाई का केली जात नाही? असे प्रश्न याठिकाणी निर्माण होत आहेत.

Loading Comments