अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या


अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या
SHARES

 मालाड पूर्व येथील सिद्धेश्वर नगरात एका व्यक्तीने आपल्या पत्नीची मारहाण करून हत्या केली. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय तिच्या पतीला होता. ही घटना गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास घडली. कुरार पोलिसांनी या प्रकरणात पतीला अटक केली आहे. 

सिद्धेश्वर नगरात राहणारा दिनेश मोरे (dinesh more)  याचे काही वर्षांपूर्वी रेश्मा (बदललेले नाव) नावाच्या महिलेशी लग्न झाले होते. पण लग्नाच्या काही वर्षानंतर दोघांमध्ये भांडण होण्यास सुरूवात झाली. आपल्या पत्नीचे परपुरूषाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय दिनेशला होता. यावरून दोघांमध्ये वारंवार भांडणं होत होती. घटनेच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी या दोघांमध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून वाद झाला. याचं रुपांतर जोरदार भांडणात झालं. यावेळी राग अनावर न झाल्याने दिनेशने त्याच्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. अधिक रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह पंचनामा करून पोस्टमॉर्टमसाठी पाठविला. दिनेशला आयपीसी कलम ३०२ अन्वये हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे. त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. कुरार पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 



हेही वाचा -

किंग्ज सर्कल स्थानकाजवळ पादचारी पुलाचा भाग कोसळला, सुदैवाने मोठा अपघात टळला

स्वच्छ खाजगी रुग्णालयाचा मान कोहिनूर हॉस्पीटलला




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा