Advertisement

किंग्ज सर्कल स्थानकाजवळ पादचारी पुलाचा भाग कोसळला, सुदैवाने मोठा अपघात टळला

मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर (central railway) मार्गावरील किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाजवळील (Kings circle railway station) एका पादचारी पुलाचा (FOB) लोखंडी गर्डर सकाळी ६ वाजेच्या सुमारास कोसळला.

किंग्ज सर्कल स्थानकाजवळ पादचारी पुलाचा भाग कोसळला, सुदैवाने मोठा अपघात टळला
SHARES

मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर (central railway) मार्गावरील किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाजवळील (Kings circle railway station) एका पादचारी पुलाचा (FOB) लोखंडी हाइट बॅरिअर सकाळी ६ वाजेच्या सुमारास कोसळला. सुदैवाने जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा या पुलाच्या खालून जाणाऱ्या इस्टर्न एक्प्रेस मार्गावरून (eastern expressway) एकही वाहन न गेल्याने मोठा अपघात टळला. या अपघातात केवळ एका कारचं नुकसान झाल्याचं म्हटलं जात आहे. 


किंग्ज सर्कल रेल्वे (Kings circle railway station) स्थानकाच्या जवळ अवजड वाहनांना अटकाव करण्यासाठी हा 'हाइट बॅरिअर' लावण्यात आला आहे. एका भरधाव कारच्या धडकेमुळे हा बॅरिअर कोसळल्याचं म्हटलं जात आहे. या अपघातात कारचं नुकसान झालं आहे. सकाळी ६ वाजेच्या हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. हा अपघात झाला तेव्हा खालून वाहन जात नव्हतं. नाहीतर नेहमीच वर्दळीच्या असलेल्या या मार्गावर मोठा अपघात झाला असतात. 

या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी त्वरीत रस्त्याचा ताबा घेतला. त्यानंतर क्रेन बोलवून हा तुटलेला हाइट बॅरिअर तासाभराच्या आत काढून हटवला. परंतु तोपर्यंत या मार्गावरून सायन सर्कलच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना प्रचंड वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागला. शिवाय याच पुलावरून हार्बर लोकलही धावतात. मात्र, या अपघातामुळे लोकलसेवेला कुठलाही फटका बसलेला नाही, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. 

दुसरीकडे सायनचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद असल्याने या भागातील कोंडी कायम आहे. त्यामुळे सकाळच्या सुमारात सायन ते दादर हे अंतर १५ मिनिटांचं कापण्यासाठी ६० ते ७० मिनिटे लागत होते.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा