पत्नीची हत्या करून डॉक्टर जॉगिंगला

 Dadar
पत्नीची हत्या करून डॉक्टर जॉगिंगला
पत्नीची हत्या करून डॉक्टर जॉगिंगला
पत्नीची हत्या करून डॉक्टर जॉगिंगला
See all

दादर - दादर परिसरात एका दंतचिकित्सकानं पत्नीची हत्या केल्याचं उघड झालंय. विशेष म्हणजे हत्येनंतर डॉक्टरनं स्वतःच पोलीस कंट्रोलला फोन करून हत्येची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी उमेश बोबलेला (40) याला पत्नीच्या हत्येप्रकरणी अटक केली.

सात वर्षांपूर्वी उमेश आणि तनुजा यांचं लग्न झालं होतं. दोघांना पाच वर्षांचा मुलगाही आहे. पण या दोघांच्या लग्नानंतर कटुता निर्माण झाली होती. वाद एवढ्या टोकाला गेला होता की मार्च महिन्यात हे दोघं विभक्त देखील झाले होते. घरच्यांच्या मध्यस्थीनंतर दोघं एकत्र आले. शनिवारपासूनच दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. पण एक दिवस होतो न होतो तोच दोघांमध्ये वाद उफाळून आला. भांडण झाले आणि रागाच्या भरात उमेशनं आपल्या पत्नीवर चाकूनं हल्ला केला. तिच्या मानेवर, पोटावर, छातीवर, कंबरेत वार केले. सकाळी साडे सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर काय करावे हे उमेशला उमगत नव्हते. तो मॉर्निंगवॉकला गेला आणि साडेनऊच्या सुमारास त्यानं स्वतः 100 नंबरवर फोन करून आपणच आपल्या पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. दोघांमध्ये पैश्यावरून वाद झाल्याचं उमेशनं पोलिसांना सांगितलं. "फोन येताच आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि उमेशला ताब्यात घेतलं. तात्काळ आम्ही अनुजाला हॉस्पिटलला नेलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं, अशी माहिती शिवाजी पार्कचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गंगाधर सोनावणे यांनी दिली.

Loading Comments