महिलांच्या बाथरूममध्ये डोकावणाऱ्या आयआयटी बॉम्बे कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला अटक

पण आरोपीच्या मोबाइलमध्ये कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण सापडले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

महिलांच्या बाथरूममध्ये डोकावणाऱ्या आयआयटी बॉम्बे कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला अटक
SHARES

मुंबईमधील मुलींच्या वसतिगृहाच्या शौचालयात डोकावणाऱ्या उपहारगृहातील कर्मचाऱ्याला पवई पोलिसांनी अटक केली.

उपहारगृहात काम करणारा आरोपी कर्मचारी रविवारी रात्री मुलींच्या वसतिगृहाच्या बाथरूममध्ये डोकावत होता. त्यानंतर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या कर्मचाऱ्यावर चित्रीकरण करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. पण आरोपीच्या मोबाइलमध्ये कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण सापडले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

पिंटू गारिया (२२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहे. तो मूळचा पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहे. उपहारगृह चालवणाऱ्या कंत्राटदारासाठी तो काम करीत होता.

मुलींच्या वसतिगृहातील प्रसाधनगृहाच्या खिडकीतून कोणी तरी डोकावत असल्याचे एका विद्यार्थिनीने पाहिले. यानंतर तिने आरडाओरडा केला. त्यामुळे तेथे अनेक जण जमले.

कीटक नाशक औषधांची फवारणी करण्यासाठी येथील उपहारगृह रविवारी बंद ठेवण्यात आले होते. मात्र येथे काम करणारे कर्मचारी रात्री वसतिगृहाच्या आवारातच थांबले होते. वसतिगृह-१० मध्ये राहणाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आरोपी पकडला गेला.

पवई पोलिसांनी सांगितले की, वसतिगृहातील उपहारगृहातील कर्मचारी पाइप डक्टच्या मदतीने वर चढून शौचालयात डोकावत होता. प्राथमिक तपासात त्याने कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण केले नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.



हेही वाचा

भाजपच्या नेत्यावर मीरा रोडमध्ये बलात्काराचा आरोप

सिद्धू मूसवाला मर्डर केस : आरोपींनी मुंबईतील सलमान खानच्या घराची केली रेकी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा