पीएनबी घोटाळा: बँकेच्या मुख्य लेखापरीक्षकाला अटक


पीएनबी घोटाळा: बँकेच्या मुख्य लेखापरीक्षकाला अटक
SHARES

पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या ११ हजार ४०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागा (सीबीआय)ने बुधवारी बँकेचे मुख्य लेखापरीक्षक (ऑडिटर) एम. के. शर्मा यांना अटक केली. या घोटाळ्याप्रकरणी बँकेने आतापर्यंत १८ जणांचं निलंबन केलं आहे.


का केली अटक?

एम. के. शर्मा हे 'पीएनबी'चे मुख्य व्यवस्थापक दर्जाचे अधिकारी असून, गैरव्यवहार झालेल्या फोर्टमधील ब्रॅडी हाऊस शाखेच्या लेखा परीक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यामुळे लेखा परीक्षण करताना त्यांना या गैरव्यवहाराचा संशय कसा आला नाही, हे संशयास्पद असल्यामुळे सीबीआयने त्यांना अटक केली.


दोन गुन्हे दाखल

'लेटर ऑफ अंडरटेकिंग' (एलओयू) देऊन पीएनबीमध्ये झालेल्या ११ हजार ३६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी सीबीआयने दोन गुन्हे दाखल केले आहेत. पहिला गुन्हा २९ जानेवारीला नोंदवण्यात आला होता. त्यात नीरव मोदी व इतर आरोपींनी २८० कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.


फसवणूक ६ हजार कोटींची?

प्रत्यक्षात या प्रकरणातील फसवणूक ६ हजार कोटींची असल्याचं सीबीआयच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. याशिवाय मेहुल चोकसीसह इतर आरोपींवर ४८८६ कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा नोंदवण्यात आला होता.



हेही वाचा-

पीएनबी घोटाळा: मेहुल चोकसीची १२१७ कोटींची मालमत्ता जप्त



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा