कांदिवलीत 12 दिवसांच्या बाळाचं अपहरण

 Kandivali
कांदिवलीत 12 दिवसांच्या बाळाचं अपहरण

कांदिवली - परिसरातून 12 दिवसांच्या तान्हुल्याचं अपहरण झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 31 डिसेंबरच्या रात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. साहिल आणि हिना अशी या मुलाच्या पालकांची नावं आहेत. हे दोघं एका प्रायव्हेट कंपनीत काम करत असून लालजीपाडा संजयनगर येथे राहतात. हिना झोपलेली असताना तिच्या बाळाचं अपहरण करण्यात आल्याचं कांदिवली पोलिसांनी सांगितलं. या भागातलं सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Loading Comments