मुंबईला फिरायला आलेल्या इटालियन महिलेवर बलात्कार


मुंबईला फिरायला आलेल्या इटालियन महिलेवर बलात्कार
SHARES

मुंबई दर्शनासाठी आलेल्या एका 37 वर्षीय इटालियन महिलेवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 11 जून रोजी ही महिला बंगळुरूहून मुंबईत फिरायला आली होती. याप्रकरणी पीडित महिलेने जुहू पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुंबई पोलीस सध्या या व्यक्तीच्या शोधात आहेत.


संपूर्ण प्रकार

14 जून रोजी गेट वे इंडियाला भेट दिल्यानंतर महिला मुंबई दर्शनासाठी टॅक्सी किंवा बसच्या शोधात होती. याचदरम्यान स्वत:ला गाइड म्हणवून घेणाऱ्या एका व्यक्तीच्या ती संपर्कात आली. दरम्यान त्या अज्ञात व्यक्तीने संपूर्ण मुंबईचं दर्शन करून देण्याचं सांगत महिलेला विश्वासात घेतलं. रात्री साडेआठच्या सुमारास त्या व्यक्तीने महिलेला टॅक्सीत बसवत टॅक्सी जुहूच्या एक वाइन शॉपजवळ थांबवली आणि त्या महिलेवर बलात्कार केला.


अखेर महिलेने केली तक्रार

यासर्व प्रकारानंतर महिलेने त्या व्यक्तीपासून आपली सुटका करून घेत दक्षिण मुंबईत बुक केलेल्या हॉटेलमध्ये गेली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईहून बंगळुरूला राहत असलेल्या आश्रमात गेली. त्यानंतरसुद्धा तो व्यक्ती तिच्या शोधात होता. त्याने इंस्टाग्रामवर मेसेज करत पत्ता विचारून पुन्हा तिला त्रास द्यायला सुरुवात केली. अखेर पीडित महिलेने दिल्लीत जाऊन इटालियन दुतावासाशी संपर्क साधत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली.

महिलेच्या तक्रारीनुसार जुहू पोलिसांनी भादंवि कलम 376(2) नुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. मुंबई पोलीस सध्या या व्यक्तीच्या शोधात आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा