अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणारा साधू गजाआड

Dahisar
अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणारा साधू गजाआड
अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणारा साधू गजाआड
See all
मुंबई  -  

अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली दहिसरमधील जैन मंदिराच्या एका  साधूला पोलिसांनी अटक केली आहे. ठाकूरसिंह राजभोर(41) असं या आरोपी साधूचं नाव आसून तो 15 वर्षांपासून या मंदिरात काम करतो. विशेष म्हणजे मंदिराच्या शेजारील इमारतीतील सुरक्षारक्षकाच्या सहा वर्षाच्या मुलीलाच या नराधमाने लक्ष्य केलं.

असं सांगितलं जातंय की, तीन दिवसांपासून हा नराधम या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करत होता. सोमवारी या सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला अचानक त्रास होऊ लागल्याने तिच्या आईने तिला विचारले असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं.

दहिसर पोलिसांनी ठाकुरसिंह राजभोरला मंगळवारी पोस्को कायद्यांतर्गत कारवाई करत अटक केली असून बुधवारी त्याला कोर्टात हजर केले जाईल.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.