जयपूर-मुंबई ट्रेन गोळीबार: RPF कॉन्स्टेबलला एका प्रवाशाला हॉस्टेज ठेवायचे होते का? तपास चालू

पोलीस या अँगलने देखील तपास करत आहेत.

जयपूर-मुंबई ट्रेन गोळीबार: RPF कॉन्स्टेबलला एका प्रवाशाला हॉस्टेज ठेवायचे होते का? तपास चालू
SHARES

जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये (Jaipur-Mumbai Train Firing)  सोमवारी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंग याने अचानक गोळीबार करून चार जणांचा बळी घेतला. या प्रकरणाच्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Jaipur-Mumbai Train terror attack) 

पहिल्या तीन जणांची हत्या केल्यानंतर सिंगने चौथ्या व्यक्तीला गोळ्या घातल्याचा संशय जीआरपी पोलिसांना आहे.

पण तिसर्‍या व्यक्तीला गोळ्या घालण्यापूर्वी सिंगला बहुधा त्याला हॉस्टेज ठेवायचे होते. पोलीस या अँगलने देखील तपास करत आहेत.

कोच B2 आणि पँट्री कारमध्ये हॉस्टेज स्थिती

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चेतन सिंगने सय्यद सैफुद्दीन नावाच्या एका प्रवाशाला कोच क्रमांक बी 2 मध्ये हॉस्टेज बनवले. त्याने त्याला बंदुकीच्या जोरावर B1 मार्गे पँट्री कारमध्ये नेले.  पॅन्ट्री कारमध्ये त्याला काही विचारण्याचा प्रयत्न केला. यानंतर सय्यद सैफुद्दीनला पॅन्ट्री कारमध्ये गोळ्या घालण्यात आल्या.

एएसआय टिकाराम मीणा आणि बी5 कोचमधील प्रवाशावर गोळीबार केल्यानंतर तो बी2 कोचमध्ये गेले. तेथून पॅन्ट्री कारमध्ये गेला जिथे त्याने सय्यद सैफुद्दीनला गोळी झाडली आणि नंतर S6 वर जाऊन दुसऱ्या प्रवाशाला गोळी झाडली. 

एका अधिकाऱ्याने सांगितले की, सैफुद्दीनला सिंग यांने दुसऱ्या बोगीतून बंदुकीच्या जोरावर आणले आणि गोळ्या झाडल्या.

आरोपी तपासात सहकार्य करत नाही

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सिंग चौकशीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सहकार्य करत नाही आहे. 

ट्रेनमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा तपास बोरिवली जीआरपी करत आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी आतापर्यंत ट्रेनमधील 20 प्रवाशांचे जबाब नोंदवले आहेत.

31 जुलै रोजी पहाटे 5 ते 5:15 च्या दरम्यान चेतन सिंगने चालत्या ट्रेनवर गोळीबार केला होता, त्यात आरपीएफचा एएसआय आणि तीन प्रवाशांसह चार जणांचा मृत्यू झाला होता.



हेही वाचा

"भारतात राहायचंय तर फक्त मोदींना, योगींना मत द्या", गोळीबारीनंतरचा RPF कॉन्स्टेबलचा व्हिडिओ व्हायरल

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा