"भारतात राहायचंय तर फक्त मोदींना, योगींना मत द्या", गोळीबारीनंतरचा RPF कॉन्स्टेबलचा व्हिडिओ व्हायरल

जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये सोमवारी RPFच्या हवालदाराने गोळीबार करत ४ जणांना ठार केले. याचाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पहा व्हिडिओ आणि यावरील पोलिसांचे स्पष्टीकरण

"भारतात राहायचंय तर फक्त मोदींना, योगींना मत द्या",  गोळीबारीनंतरचा RPF कॉन्स्टेबलचा व्हिडिओ व्हायरल
SHARES

रेल्वे संरक्षण दलाच्या (RPF)एका हवालदाराने सोमवारी पालघर रेल्वे स्थानकाजवळ चालत्या जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये (Jaipur Express Terror Attack) वरिष्ठ सहकारी आणि तीन प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

मीरा रोड आणि दहिसर स्थानकांदरम्यान (मुंबई उपनगरीय नेटवर्कवर) थांबलेल्या ट्रेनची साखळी ओढून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना RPF च्या हवालदाराला पकडण्यात आले. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. 

कॉन्स्टेबल चेतन सिंग (३४) याने आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक टिका राम मीना आणि B5 कोचमधील अन्य एका प्रवाशाला त्याच्या रायफलने गोळ्या घालून ठार केले. त्याने B6 कोचमधील आणखी एका प्रवाशाला गोळ्या घालून ठार केले, आणि B5 आणि B6 डब्यांच्या दरम्यान असलेल्या पॅन्ट्री कारमधील आणखी एकाची हत्या केली, असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.

जीआरपी आयुक्त रवींद्र शिसवे यांनी पत्रकारांना सांगितले की, चेतन सिंग असे कॉन्स्टेबलचे नाव आहे.

आता या धक्कादायक घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, आरोपी हातात बंदूक घेऊन प्रवाशांना धमकावताना दिसत आहे. व्हिडिओत एका प्रवाशाचा मृतदेह त्याच्या पायाजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसत आहे.

व्हिडिओमध्ये सिंग बोलतोय की, नुकतेच ज्या लोकांना मारले ते पाकिस्तानशी संबंधित होते. नंतर तो म्हणाला की मीडिया देखील हेच म्हणेल आणि ज्याला राहायचे आहे त्याने फक्त "मोदी आणि योगी" यांनाच मत द्यावे.

तथापि, मुंबई लाईव्ह या व्हिडिओची पुष्टी करत नाही. पोलिस व्हिडिओचा अधिक तपास करत आहेत. 

घटनेनंतर आरपीएफ कॉन्स्टेबलचा पळून जाण्याचा प्रयत्न

एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सिंगला नंतर सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी) कर्मचार्‍यांनी पकडले. चेन खेचल्यानंतर मीरा रोड आणि दहिसर स्थानकांदरम्यान ट्रेन थांबली तेव्हा तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पकडले आणि त्याचाकडून रायफल जप्त केली. 

अब्दुल कादिरभाई मोहम्मद हुसेन भानपुरवाला (४८), अख्तर अब्बास अली (४८) आणि सदर मोहम्मद हुसेन अशी मृत प्रवाशांची नावे आहेत.

"मुंबईकडे जाणाऱ्या जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसने वापी स्टेशन (गुजरातमधील) ओलांडल्यानंतर पहाटे 5 वाजता ही घटना घडली. एस्कॉर्ट ड्युटीवर असलेल्या RPF कॉन्स्टेबल चेतन सिंगने त्याच्या वरिष्ठ टिका राम मीणा यांच्यावर गोळीबार केला आणि आणखी तीन प्रवाशांना गोळ्या घालून ठार केले. ट्रेनच्या वेगवेगळ्या बोगींमध्ये, ”सरकारी रेल्वे पोलीस (जीआरपी) आयुक्त रवींद्र शिसवे यांनी माध्यमांना सांगितले.

या घटनेमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नसून तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

व्हायरल व्हिडिओबाबत विचारणा केली असता, शिसवे म्हणाले की, व्हिडिओ क्लिपसह इतर गोष्टींची तपासणी केली जात आहे.

"व्हिडिओ वरून कोणत्याही निष्कर्ष लावणे घाई केल्यासारखे होईल. या टप्प्यावर, तपासाबाबत काहीही भाष्य करणे आणि तपशील सांगणे योग्य ठरणार नाही," 

"धावत्या ट्रेनमध्ये घडलेली ही पहिलीच घटना आहे. प्रवासी घाबरले आहेत. आम्ही त्यांना आश्वस्त करू इच्छितो की पोलिस या घटनेची सविस्तर चौकशी करतील," असे ते पुढे म्हणाले.

जीआरपीच्या म्हणण्यानुसार, सिंगने त्याच्या रायफलचे 12 राऊंड फायर केले. घटनेनंतर जीआरपीने त्याच्या रायफलमधून आठ गोळ्या जप्त केल्या आहेत. 

सिंग हा उत्तर प्रदेशातील हाथरसचा असून तो मीरा रोड रेल्वे पोलिसांच्या ताब्यात आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. चार मृतदेह बोरिवली रेल्वे स्थानकावर रेल्वेतून बाहेर काढण्यात आले, असे त्यांनी सांगितले.

पश्चिम रेल्वेचे (डब्ल्यूआर) मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी पीटीआयला सांगितले की, आरोपी हवालदार येथे लोअर परळ आरपीएफ पोस्टशी संलग्न होता, तर एएसआय टिका राम मीना दादर आरपीएफ पोस्टशी संलग्न होता.

आरपीएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एएसआय मीना ही राजस्थानमधील सवाई माधोपूरची आहे. ते 2025 मध्ये निवृत्त होणार होते.

रेल्वे अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी हवालदाराची गेल्या मार्च महिन्यात भावनगर विभागातून मुंबईत बदली झाली होती आणि अलीकडेच तो त्याच्या मूळ गावी हातरसला गेला होता. तो १७ जुलै रोजी ड्युटीवर रुजू झाला.

त्याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्येसाठी शिक्षा) आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत अटक करण्यात आली.

मृत ASI मीना यांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे, असे पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मीनाच्या नातेवाईकांना 20,000 रुपयांच्या अंत्यसंस्काराच्या खर्चाव्यतिरिक्त रेल्वे सुरक्षा कल्याण निधी (निधी) मधून 15 लाख रुपये दिले जातील. त्याच्या नातेवाईकांना मृत्यू-सह-निवृत्ती उपदान आणि गट विमा योजनेतूनही रक्कम मिळेल, असे ठाकूर म्हणाले.

सिंह हे येथील बॅरेकमध्ये राहत होते. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी, 6 आणि 8 वर्षांची दोन मुले आणि त्याचे पालक यांचा समावेश आहे.

 ( हा एक व्हायरल व्हिडिओ असून मुंबई लाईव्ह या व्हिडिओची पुष्टी करत नाही.) 


हेही वाचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! पुढचे 6 दिवस हाय टाईड, पालिकेचा इशारा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा