दहिसरमध्ये गोळ्या झाडून ज्वेलर्सची हत्या

बुधवारी सकाळी तिघे जण बंदुकीचा धाक दाखवून या ज्वेलर्स दुकानात शिरले आणि त्यांनी दुकानात लूट केली.

दहिसरमध्ये गोळ्या झाडून ज्वेलर्सची हत्या
SHARES

दुकानात शिरुन दिवसाढवळ्या गोळी झाडून ज्वेलर्स (Jewelers) मालकाची हत्या (shot dead)  केल्याची घटना दहिसरमध्ये (dahisar) घडली आहे. शैलेंद्र रमाकांत पांडेय (४५) असं मृताचं नाव आहे. 

दहिसर पूर्व येथील गावडे नगर परिसरात ओम साईराज ज्वेलर्स (Om Sairaj Jewelers) हे दुकान आहे. बुधवारी सकाळी तिघे जण बंदुकीचा धाक दाखवून या ज्वेलर्स दुकानात शिरले आणि त्यांनी दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी ज्वेलर्स मालकानं त्यांना विरोध केला असता त्यांच्यावर लुटारुंनी गोळी झाडली. यात ज्वेलर्स मालकाचा जागीच मृत्यू झाला.

हत्येनंतर तिघेही जण दुकान लुटून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच दहिसर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. 

तिन्ही आरोपी एकाच दुचाकीवरुन आले होते. दुकानातील सोनं लुटल्यानंतर ते पसार झाले. पोलिसांनी मुंबईच्या सर्व एन्ट्री पॉईंट्सवर नाकाबंदी केली आहे. दरम्यान, एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.



हेही वाचा -

बापाने आईसक्रीमधून ३ मुलांना दिलं विष, एकाचा मृत्यू

डेक्कन एक्स्प्रेसच्या व्हिस्टाडोम कोचला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा