Advertisement

डेक्कन एक्स्प्रेसच्या व्हिस्टाडोम कोचला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

मुंबई-पुणे या रेल्वे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन एक्स्प्रेसच्या व्हिस्टाडोम कोचला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

डेक्कन एक्स्प्रेसच्या व्हिस्टाडोम कोचला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद
SHARES

मुंबई-पुणे या रेल्वे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन एक्स्प्रेसच्या व्हिस्टाडोम कोचला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एलएचबी कोचसह मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस विशेषची पहिली फेरी २६ जून रोजी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या मार्गावर प्रथमच व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला आहे. या व्हिस्टाडोम कोचमुळं प्रवासी निसर्गरम्य सौंदर्याचा आणि अनुभवाचा आनंद लुटत आहेत. गेल्या काही दिवसात व्हिस्टाडोम कोचला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

२६ जून रोजी सकाळी मुंबईहून पुण्याला जाताना ४४ तर येताना ३४ आसन आरक्षित करण्यात आले होते. २७ जुलै रोजी मुंबईहून पुण्याला जाताना ४१ तर पुण्याहून मुंबईला येताना ४४ आसन आरक्षित करण्यात आले होते. व्हिस्टाडोम कोचमुळे माथेरान टेकडी (नेरळजवळील), सोनगीर टेकडी (पळसधारीजवळ), उल्हास नदी (जांबरुंगजवळ), उल्हास खोरे, खंडाळा, लोणावळा येथील भाग आणि दक्षिण पश्चिम घाटावरील धबधबे, बोगद्यांजवळून जाताना निसर्गरम्य दृश्यांचा आनंद प्रवाशांना घेता येत आहे.

सध्या पर्यटनस्थळांना बंदी असली, तरी डेक्कन एक्स्प्रेसच्या व्हिस्टाडोम कोचच्या माध्यमातून हा निसर्ग प्रवाशांना पाहता येणार आहे. सध्या मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला अशा प्रकारचा डबा जोडण्यात येत आहे. त्यातून कोकण आणि गोव्यापर्यंतच्या निसर्गाची अनुभूती प्रवाशांना मिळते आहे.

या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नेरळ (केवळ मुंबईतून येताना), लोणावळा, तळेगाव, खडकी आणि शिवाजीनगर येथे थांबा असेल. तिला विस्टाडोम डब्यासह ३ वातानुकूलित चेयर कार, १० द्वितीय क्षेणीचे डबे असणार आहेत. गाडीचे आरक्षण २४ जूनला सुरू करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून कळविण्यात आले आहे.

डब्यांची वैशिष्ट्ये

  • विस्टाडोम डब्यांच्या काचेच्या खिडक्या सामान्य डब्यांच्या तुलनेत मोठ्या आहेत. 
  • छतालाही काचेच्या खिडक्या आहेत. 
  • चारही बाजूने निसर्गाचे रूप पाहण्यासाठी गॅलरीचीही व्यवस्था. 
  • आरामदायक आणि नव्वद अंशाच्या कोनात फिरणारी आसने.




हेही वाचा -

महापालिकेच्या शाळांमध्येही डिजिटल वर्ग सुरू होणार

२६/११ हिरो तुकाराम ओंबळे यांचा अनोखा सन्मान, नव्या कोळी प्रजातीला दिले नाव


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा