SHARE

कमला मिल्स कंपाऊंडमधील मोजोस बिस्त्रो या पबला अाग लागली तरी त्याच्या बाजूलाच असलेल्या वन अबोव्ह पबमध्ये करण्यास अालेले अनधिकृत बांधकाम १४ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले अाहे. मोजोस अाणि वन अबाेव्ह पबमध्ये असलेल्या अापत्कालीन मार्गामध्ये सामान ठेवून वन अबोव्हच्या कर्मचाऱ्यांनी अडथळा निर्माण केला होता. तसंच अाग लागल्यानंतर कर्मचारी नागरिकांना मदत न करता पळून गेले होते. या पबचे मालक तपास यंत्रणेला सहकार्य न करता अटक टाळत असल्याचे निदर्शनास अाल्याने मोजोससह वन अबोव्हही दोषीच असल्याचे पोलिसांनी म्हटले अाहे.


शरणागती की अटक?


कमला मिल्स कंपाऊंडमधील वन अबोव्हच्या तिन्ही मालकांना बुधवारी रात्री पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. या प्रकरणातील फरार अारोपी क्रिपेश अाणि जिगर संघवी यांना पोलिसांनी वांद्रे इथून तर अभिजित मानकरला मरीन ड्राइव्ह इथून अटक केल्याचे पोलीस सांगत अाहेत. मात्र हे तिघे स्वतःहून शरण अाल्याचे मत तिघांच्या वकिलांनी न्यायालयात मांडले अाहे.


होणार कसून चौकशी

अटक आरोपींकडे पब सुरू करण्यासाठी लागणाऱ्या शासकीय परवानग्या होत्या का ? त्या परवानग्या कशा मिळाल्या? पबच्या अंतर्गत बांधकाम करणारे कोण आणि कुणाच्या सांगण्यावर त्यांनी हे बांधकाम केले. तसेच आग लागली त्यावेळी ज्वालाग्रही पदार्थ पबमध्ये मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली. दरम्यान, आग लागली त्यावेळी पबमध्ये उपस्थित असलेल्यांचे जबाब नोंदवणे गरजेचे असून पबमधील त्यावेळीचे सीसीटीव्ही फूटेज तपासणे बाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर गुन्हा नोंदवल्यानंतर अटक टाळण्यासाठी आरोपी स्वतःची ओळख लपवत होते. त्यावेळी ते कोणाकोणाच्या संपर्कात होते. कोणी त्यांना मदत केली किंवा आश्रय दिला, याची माहिती घेण्यासाठी सर्व आरोपींची एकत्रित चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या