दंडामार गँग गजाआड

कांदिवली - पोलिसांनी दंडामार टोळीतल्या 4 जणांना अटक केली आहे. या टोळीमुळे मुंबईकरांमध्ये घबराट पसरली होती. या टोळीने 16 ऑगस्ट रोजी कांदिवलीतल्या एका व्यापाऱ्यावर काठीने हल्ला करत त्याच्यावळीत पाच लाख रुपये हिसकावून पळ काढला होता. त्यानंतर पोलीस त्यांच्या मागावर असतानाही त्यांची लूट सुरूच होती. यापूर्वी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातल्या पोलीस स्थानकात या टोळीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. सध्या मुंबई तसंच आसपासच्या जिल्ह्यात या टोळीतल्या आणखी काही जणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Loading Comments